पेट्रोल-डिझेलची चिंता मिटली, आता कॉफीवर चालतायत गाड्या...
पेट्रोल-डिझेलच्या दरात होणाऱ्या वाढीमुळे तुम्ही त्रस्त आहात? तर, मग ही बातमी तुमच्यासाठी आहे.
नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या दरात होणाऱ्या वाढीमुळे तुम्ही त्रस्त आहात? तर, मग ही बातमी तुमच्यासाठी आहे.
नागरिकांना दिलासा देणारी बातमी
हे वृत्त वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही पण ही बातमी १०० टक्के खरी आहे. आता वाढत्या पेट्रोल-डिझेच्या किमंतीमुळे हैराण झालेल्या नागरिकांना या वृत्तामुळे दिलासा मिळणार आहे.
कॉफीचा वापर करुन बस धावते
कॉफीचा वापर करुन तयार होणाऱ्या तेलाचा वापर करून बस चालवण्याचा प्रयोग केला जात आहे. लंडनमध्ये हा प्रयोग करण्यात येत आहे.
कॉफीच्या कचऱ्यापासून तेल
लंडनमध्ये कॉफीच्या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या तेलाचा वापर करून बस चालवण्यात येत आहेत. बीबीसीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ही माहिती लंडन परिवहनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कॉफीच्या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या तेलाला ब्लेंडिंग ऑईल म्हटलं जातं. हे तेलं डिझेलमध्ये मिसळून जैवइंधन तयार करण्यात आलं. या जैवइंधनाचा वापर लंडनमधील लंडनमधील परिवहन सेवेच्या बसेसमध्ये करण्यात येत आहे.
प्रदूषण कमी होण्यास मदत होणार
हा प्रयोग यशस्वी झाल्यास जैवइंधनाचा वापर मोठ्या प्रमाणात होण्यास सुरुवात होईल. याच्या वापरामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. लंडनमधील टेक्नोलॉजी फर्म बायो-बीन लिमिटेडच्या मते, आम्ही जैवइंधन इतकं बनवलं आहे की, ज्यामुळे एक बस वर्षभर धावू शकेल.
हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर लंडन परिवहन पेट्रोलचा वापर कमी करुन जैवइंधनाचा वापर करण्यास सुरुवात करतील. लंडनमध्ये एका वर्षात २ लाख टन कचरा तयार होतो. त्यामुळे ९,५०० बसेस कॉफीच्या कचऱ्यापासून तयार करण्यात आलेल्या जैवइंधनावर चालतात. अशा प्रकारे कॉफीच्या कचऱ्यापासून जैवइंदन तयार करण्याची ही पहिलीच वेळ आहे.