लंडन : इंग्लंडमध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ७ ठार तर २० जण जखमी झालेत. १५ दिवसांच्या आत पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यान हादरलं आहे. दरम्यान,  ३ दहशतवाद्यांना ठार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लंडनमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले झाल्याचे सांगण्यात येत आहे. लंडन ब्रिजवर एका भरधाव कारने पायी चालणाऱ्या नागरिकांना चिरडले. तर, दुसरीकडे एका रेस्टॉरन्टमध्ये एका व्यक्तीने लोकांवर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात ७ नागरिकांचा मृत्यू झाला असून जवळपास २० जण जखमी झाले आहेत.  


कार हल्ल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला आहे. या घटनेनंतर खबरदारी म्हणून लंडन ब्रिजवरील दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. परिसरातील बसचे मार्गही बदलण्यात आले आहेत. लंडनमधील भुयारी रेल्वे स्टेशन्स बंद करण्यात आली आहेत.  


दरम्यान, याआधी २३ मे रोजी इंग्लंडच्या मॅन्चेस्टर अरिना परिसरातही अशाच हल्ला झाला होता. प्रसिद्ध अमेरिकन पॉप स्टार अरियाना ग्रँडे हिचा कार्यक्रम संपल्यानंतर स्फोट करण्यात आले होते. या हल्ल्यातही २२ नागरिकांचा मृत्यू झाला होता.