मुंबई : प्रेम कधी, कुठे आणि कोणाला होईल हे सांगता येत नाही. अशीच एक लव्हस्टोरी समोर आली आहे. ज्यामध्ये एका कपलला तब्बल 30 हजार फूट उंचीवर प्रेम झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ज्या उंचीवर त्यांना प्रेम झाले त्याचं उंचीवर हे कपल रहायचे,खायचे, झोपायचे अशी माहिती आहे. या कपलच्या लव्हस्टोरीची चर्चा आता सोशल मीडियावरही रंगलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर चर्चेत असलेले लव्हस्टोरीतले हे कपल एमिरेट्स एअरलाइनमध्ये केबिन क्रू मेंबर आहेत. नोकरी करता करता या दोघांमध्ये 30,000 फूट उंचीवर विमानात एकमेकांवर प्रेम जडलं. 31 वर्षीय नॅथली पीटरसन आणि 27 वर्षीय स्टेफानो एव्हेलिनो असे या जोडप्याचे नाव आहे. गेल्या तीन वर्षापासून हे दोघेही मेक्सिकोमध्ये एकत्र राहत आहेत. 


 नॅथली पीटरसन आणि स्टेफानो एव्हेलिनो हे कपल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. या जोडप्याचे यूट्यूबवर 80 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत तर इन्स्टाग्रामवरही त्याची चांगली फॅन फॉलोविंग आहे. स्टेफानो नेहमीच आपल्या दैनंदिन जीवनाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. स्टेफानो त्याच्या प्रवासाचे अनुभव, लक्झरी हॉटेलमधील मुक्काम, विमानातील व्यवस्था इत्यादींबद्दलचे व्हिडिओ YouTube वर अपलोड करत असतो. 



नुकताच या जोडप्याने सोशल मीडियावर आपला एक व्हिडिओ युट्युबवर अपलोड केलाय. या व्हिडिओत कपल त्यांचा संपूर्ण दिवस केबिन क्रूच्या कामात कसा घालवतात, या संबंधित हा व्हिडिओ आहे.  


नॅथली सांगते की, केबिन क्रू टीमला दोन तास आधी विमानतळावर पोहोचावे लागते. दिवसा किंवा रात्री कोणत्याही वेळी शिफ्ट लागते. प्रवाशांचे आगमन होण्यापूर्वी विमानात उतरणे आणि उतरल्यानंतर विमानातून उतरणे हा नित्यक्रमाचा भाग आहे. शिफ्ट नेहमी बदलत असल्याने झोपेवर मोठा परिणाम होत असल्याचेही ती सांगतेय. 


 नॅथली पीटरसन आणि स्टेफानो एव्हेलिनोची एक अनोखी लव्हस्टोरी आहे, दोघांचं एक अनोखे विश्व आहे. तसेच 30 हजार फुट उंचीवरील त्यांची ही लव्हस्टोरी सोशल मीडियावर फार चर्चेत आहे.