Love Story Of Thailand Couple : प्रेमात (Love) कसली सीमा नसते, ना भाषेची ना राज्याची ना वयाची...आजकाल आपण आपल्या आजूबाजूला पाहिलं आहे, अनेक जण लव्ह मॅरेज (Love marriage) करतात. त्यांचा वयात अंतरही असतं. पूर्वी एक अलिखित नियम होता लग्न करताना मुलगा मोठा आणि मुलगी लहान असावी.मात्र गेल्या काही वर्षांमध्ये हा ट्रेंड बदला आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याची बायको डॉ. अंजली मोठी आहे. तर बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) यांच्यामध्ये पण वयामध्ये अंतर आहे. आता हेच घ्या ना बॉलिवूडमधील लव्ह बर्डस अभिनेत्री मलायका (Malaika) आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) यांच्यामध्ये वयाचं अंतर आहे. मलायका अर्जुनपेक्षा खूप मोठी आहे. पण सध्या सोशल मीडियावर (Social media) एक लव्ह स्टोरी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 



अजब कपलची अजब लव्ह स्टोरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही प्रेम कहाणी आहे एका 19 वर्षीय  तरुणाची...या तरुणाचा जीव जडला तोही आजीच्या वयाच्या महिलेवर...हो, हा तरुण 56 वर्षीय आजीच्या प्रेमात इतक्या वेडा झाली की, त्याने या महिलेशी साखरपुडा केला. एवढंच नाही तर तो आता या महिलेशी लग्न करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे हे दोघे 9 वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात बुडाले आहे. जगभरात सध्या या लव्ह स्टोरीची जोरदार चर्चा होतं आहे. (love story boy love with 56 year old woman nmp)


कुठली आहे ही अनोखी प्रेमकथा


या दोघांच्या वयात 37 वर्षांचा फरक असूनही या दोघांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. समाजाचा विचार न करता या तरुणाने वृद्ध महिलेशी थायलंडमध्ये (Thailand) साखरपुडा केला. वुथिचाई चंताराज (Wuthichai Chantaraj) हा 10 वर्षांचा असताना जानला नमुआंगराक  (Janla Namuangrak) या महिलेशी भेट झाली. वुथिचाई हा जानलाचा शेजारी होता.जानला नमुआंगराकने तिचे घर स्वच्छ करण्यासाठी एकदा चंताराजाची मदत मागितली आणि कामाच्या दरम्यान दोघांची मैत्री झाली. नंतर या हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले. 


प्यार किया तो डरना क्या!


वुठीचाय सांगतो की, तो दोन वर्षांपासून जानलासोबत राहत आहे. आतापर्यंतच्या आयुष्यात पहिल्यांदाच असं वाटलं की कोणीतरी माझ्यासोबत आरामात जगत आहे. जानला ही एक मेहनती आणि प्रामाणिक महिला आहे. मला तिचं खूप कौतुक आहे. या जोडप्याकडे पाहून कळतं की त्यांना समाजाची कुठलीही चिंता नाही. त्यांच्या वयातील अंतरानेही त्यांचा नात्यामध्ये काही फरक पडतं नाही. सार्वजनिक आणि मुलाखती दरम्यान त्याच्यामधील प्रेम दिसून येतं. एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करतानाही त्यांनी कुठलीही भीती वाटतं नाही. शहरात वावरताना, डेटवर जाताना ते एकमेकांच्या हातात हात घालून फिरतात. अगदी एकमेकांना किस करायलाही हे दोघे लाज नाही. असं म्हणतात ना प्यार किया तो डरना क्या...बस मग



वृद्ध महिलेलीची अशी पण एक कहाणी


जानला ही घटस्फोटित महिला असून तिला 20 ते 30 वयोगटातील तीन मुलं आहेत. जालना म्हटलं की, वुठीचाईमुळे तिला पुन्हा तरुण वाटतं. 'वुथीचाई माझ्यासाठी सुपरहिरोप्रमाणे आहे. त्याने मला रोज मदत केली. जसा जसा तो मोठा झाला आम्हाला एकमेकांबद्दल प्रेम जाणवायला लागलं. आम्ही लवकरच लग्न करण्याचा विचार करत आहोत.