Love Story : असं म्हटलं जातं की प्रेम आंधळं असतं. प्रेमात जात-पात, धर्म, गरीब-श्रीमंत, लहान-मोठं काही पाहिलं जात नाही. जगात अशी अनेक उदाहरण आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. शाळेत शिकत असताना एका विद्यार्थ्याला त्याची शिक्षिका आवडू लागली. मोठं झाल्यावर तिच्याशीच लग्न करायचं हे सुद्धा त्याने मनाशी ठरवलं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा विद्यार्थी आता आपल्या आवडत्या शिक्षिकेशी लग्न करणार आहे. तेरा वर्षांपूर्वी शाळेत शिकत असताना या विद्यार्थ्याला आपली टीचर आवडू लागली होती. (Student) crush on Teacher get Married)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे घटना


ब्रिटनमधली ही लव्ह स्टोरी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. न्यूयॉर्क पोस्ट वेबसाईटच्या रिपोर्टनुसार 33 वर्षांचा स्कॉट डेव्हिस (Scott Davies) हार्टफोर्डशायरमधल्या बार्क्ले शाळेत शिकत होता. शाळेत शिकत असताना हेलेन बूथ (Helen Booth) नावाची शिक्षिका त्याला आवडू लागली. हेलेन आता 41 वर्षांची आहे. 13 वर्षांपूर्वी हेलेन बूथ ही शारीरिक शिक्षणाची शिक्षिका होती. 2009 मध्ये स्कॉटला हेलेनविषयी आकर्षण वाटू लागलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 2022 मध्ये दोघं एकत्र आले.


शिक्षिकेवर जडला जीव


शाळा सोडल्यानंतर काही वर्षांनी स्कॉट आणि हेलेन एकमेकांना भेटले आणि दोघांची जवळीक वाढली. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि एकत्र राहुल लागले. ऑगस्ट 2024मध्ये इबिजामधल्या एका समुद्र किनाऱ्यावर 200 लोकांच्या समोर स्कॉटने हेलेनकडे आपल्या प्रेमाची कबुली दिली. हेलेनही स्कॉटचं प्रेम स्विकारलं. दोघांनी एंगेजमेंट केली असून लवकरच ते लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत.



स्कॉटने एक मजेदार किस्साही सांगितला. ज्याप्रमाणे शाळेत असताना शिक्षिक हेलेन आपली क्रश होती, त्याचप्रमाणे आपल्या इतर काही मित्रांनाही हेलेन आवडत होती. पण बाजी आपण मारल्याचं स्कॉट सांगतो. शिक्षक पूर्ण केल्यानंतर स्कॉट त्याच शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून काम करतो. तर हेलेनही त्याच शाळेत शिकवते.