Lower Earth Orbit LEO : सूर्य पृथ्वीवरील उर्जेचा प्रमुख स्त्रोत आहे. सूर्यामुळेच पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्वात आहे. सूर्यप्रकाश थेट पृथ्वीवर पोहचण्यासाठी सुमारे 8.3 मिनिटे लागतात.  मात्र, पृथ्वीवर सूर्यप्रकाशच पोहचला नाही तर काय होईल. पृथ्वीवर सर्वत्र अंधार राहील. ऊर्जा न मिळाल्याने जीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात येईल. अंतराळात भयानक स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे येत्या काही वर्षात पृथ्वीवर सूर्यप्रकाश पोहचणे कठिण होईल. भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या अशा संकटामुळे जगभरातील संशोधक चिंतेत आहेत. जाणून घेऊया काय आहे हे संकट.


हे देखील वाचा... पृथ्वीवरुन आतापर्यंत पाच वेळा जीवसृष्टी झालेय नष्ट; सहाव्यांदा भयानक विनाशाच्या वाटेवर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंतराळात निर्माण झालेले संकट मानवनिर्मीत असून याचा थेट परिणाम पृथ्वीवर होणार आहे. या अडथळ्यामुळे पृथ्वीवर सूर्यप्रकाश पोहचणार नाही अशी भिती संशोधकांनी व्यक्त केली आहे. पृथ्वीची खालची कक्षा अर्थात लोअर ऑर्बिटमध्ये  (Lower Earth Orbit - LEO) स्पेस जंक जमा झाला आहे. तसेच पृथ्वीच्या कक्षेभोवती सॅटेलाईटची गर्दी झाली आहे. 


सध्या पृथ्वीच्या लोअर ऑर्बिट झोनमध्ये  14 हजारांहून अधिक उपग्रह फिरत आहेत. त्यापैकी साडेतीन हजार उपग्रह हे निष्क्रिय झाले आहेत. तसेच हजारो टन वजनचा स्पेस जंक देखील पृथ्वीच्या लोअर ऑर्बिटमध्ये फिरत आहे. सक्रिय तसेच निष्क्रिय उपग्रह आणि  टन वजनचा स्पेस जंक पृथ्वीसाठी मोठा ठरणार आहे. कारण यामुळे पृथ्वीवर सूर्यप्रकाश पोहचण्याच अडथळा निर्माण होऊ शकतो.


जगभरातील अनेक देश आपले उपग्रह अंतराळात पाठवत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात स्पेस जंक तयार होत आहे. स्पेस ट्रॅफिक कोऑर्डिनेशनसाठी बनवलेल्या यूएन पॅनेलला याबाबत चिंता व्यक्त केली आहे.  कंपन्या आणि कॉर्पोरेट्सने एकत्रितरित्या उपग्रह प्रक्षेपणाचा विचार केला पाहिजे. उपग्रहांचे प्रक्षेपण मर्यादित असले पाहिजे. अंतराळात स्पेस जंक तयार होणार नाही तसेच स्पेस जंकची व्हिलेवाट लावण्यासाठी उपाययोजना करणे गरजचे असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे.