iPhone Price : आयफोन... फक्त नाव जरी घेतलं तरी अनेकांचेच डोळे चमकतात. आयफोन हा अॅपलच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या उपकरणांपैकी एक. असा हा आयफोन खरेदी करणं iPhone अनेकांच्याच आवाक्याबाहेरची गोष्ट. पण, जर तुम्ही चीनमध्ये असाल तर मात्र हे सहज शक्य आहे. किंबहुना इथं तुम्ही आयफोन खरेदी कराल आणि तुम्हाला आपण तो खरीदी केलं हे लक्षातही येणार नाही. कारण, त्यासाठीचा खर्च प्रचंड कमी असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विश्वास बसत नाहीय? नवनवीन तंत्रज्ञान, धमाकेदार फिचर्स या आणि अशा एकाहून एक कारणांमुळे आयफोनची लोकप्रियता कमाल वाढली आहे. अशा या आयफोनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जिथं चक्क एक आयफोन शुन्यापासून कसा तयार होतो हे दाखवण्यात आलं. 


techburner या इन्फ्लुएन्सरनं काही दिवसांपूर्वीच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला होता. जिथं आयफोनच्या बॅटरीपासून बॉडीपर्यंत सर्वकाही खरेदी करत त्यानं चक्क एका व्यक्तीकडून iPhone असेंबर करून घेतला. खऱ्या परीक्षेचा क्षण म्हणजे, आयफोन सुरू करण्याबाबतचा. इन्फ्लुएन्सरनं अखेर तो फोन सुरू केला आणि त्याची ऑपरेटिंग सिस्टीम पाहून त्यालाही धक्का बसला. त्यानं लगेचच तो आयफोन हाताळला आणि त्याच सेल्फी काढला. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Shlok Srivastv (@techburner)


हेसुद्धा वाचा : माधुरीची कार्बन कॉपी; लग्नाआधीच गरोदर राहिली अभिनेत्री, झाली कोणाचीतरी सवत... तिचं नाव आठवतंय? 


 


जिथं अनेक मंडळी दोन ते अडीच लाख रुपयांमध्ये आयफोन खरेदी करतात तिथंच या पठ्ठ्यानं मात्र तो चक्क तीन हजार रुपयांमध्ये खरेदी करून दाखवला आहे. त्याच्या या व्हिडीओवर आलेल्या प्रक्रियांचा सूर संमिश्र असला तरीही त्याचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला हे नाकारता येत नाही. थोडक्यात तुम्हीही जर आयफोन खरेदीच्या विचारात असाल, तर इथं लाखो रुपये भरण्यापेक्षा त्याच पैशांच्यामदतीनं चीन फिरा आणि तिथून येताना मोबाईल नक्की सोबत आणा, कमाल डील आहे ना....