मुंबई : आपण पाहिलं तर महिला सुंदर दिसण्यासाठी रोज अनेक ब्युटी प्रॉडक्टचा वापर करतात. पण हे ब्युटी प्रॉडक्ट तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात. जगातल्या अव्वल ब्युटी प्रॉडक्टमध्ये अत्यंत विषारी रसायनं असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या ब्युटी प्रॉडक्टमुळे कॅन्सर होण्याचा देखील धोका आहे. अमेरिका आणि कॅनडामध्ये वापरल्या जाणा-या उत्पादनांमध्ये घातक फ्लोरीन आढळून आलं आहे. एन्व्हायर्नमेंट सायन्स अँड टेक्नोलॉजी लेटर्स या नियकालिकात याविषयी शोधनिबंध प्रकाशित झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संशोधकांच्या संशोधनानुसार; फाऊंडेशन्सच्या 63 टक्के ब्रँड्समध्ये फ्लोरीनचं जास्त प्रमाण आढळल आहे. वॉटरप्रुफ मस्काराचे तब्बल 83 टक्के ब्रँड आहेत. तर लाँग लास्टिंग लिपस्टिकच्या 62 टक्के ब्रँड्समध्ये घातक केमिकल आढळून आले आहेत. संशोधनासाठी तपासण्यात आलेल्या 231पैकी 52 टक्के उत्पादनांमध्ये घातक पदार्थ असल्याचं स्पष्ट झालं आहे. 



विशेष म्हणजे, यापैकी तब्बल 88 टक्के उत्पादनांनी आपल्या कव्हरवर घातक केमिकल्सचं नाव छापणं टाळलंय. फ्लोरीन आणि अन्य घातक केमिकल्समुळे कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय. कॅन्सरबरोबरच थायरॉईड किंवा अनेक हार्मोनल आजार होऊ शकतात, अशी भीती व्यक्त होतेय. 


हे संशोधन प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच अमेरिकेमध्ये कायदा करण्याची प्रक्रिया सुरू झालीये. घातक कॉस्मॅटिक्सचे दुष्परिणाम टाळायचे असतील, तर भारतातही त्यावर लगाम घालण्याची गरज आहे.