Honeymoon Photo Viral News: टेक्नोलॉजीमुळं समाज प्रगत झाला आहे. मात्र, कधी कधी याच तंत्रज्ञानामुळं व्यक्ती चांगलाच कचाट्यात सापडू शकतो. अनेकदा चुकून आपल्या प्रायव्हेट डॉक्युमेंट व फोटो दुसऱ्यालाच सेंड होतात. असंच एका तरुणासोबत घडलं आहे. एका तरुणाने चुकून फॅमिली ग्रुपवरच बायकोचे न्यूड फोटो पाठवले आहे. या घटनेमुळं कुटुंबात एकच कल्लोळ माजला आहे. तर, या दाम्पत्याला आता कुटुंबात वावरणेही कठिण होऊन बसले आहे. या तरुणानेच स्वतःचा अनुभव शेअर केला आहे. (Honeymoon Photo Viral On Family Group)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हनिमूनवरुन परत आलेल्या या तरुणाने रेडिटवर या घटनेची माहिती दिली आहे. जेव्हा ते हनिमूनवरुन परत येत होते. तेव्हा त्याच्या कुटुंबातील लोकांनी त्यांच्याकडून हनिमुनचे फोटो पाठवण्यास सांगितले. तरुणानेही कोणता विचार न करता फोटोंचा अल्बम फॅमिली ग्रुपवर शेअर केला. मात्र, या फोटो अल्बममध्ये त्यांचे खासगी फोटोदेखील होते. हेच फोटो त्याने संपूर्ण परिवाराला पाठवले. नंतर त्याची चूक लक्षात येताच त्याने डोक्यावर हात मारुन घेतला. 


खरं तर, हनिमूनवरुन परत येताना या तरुणाने फ्लाइटमध्ये बसल्याबसल्या हनिमूनच्या फोटोंचे एक फोल्डर तयार केले होते. त्यात त्यांचे खासगी फोटोदेखील होते आणि त्याच फोटोंची लिंक त्याने व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकले 


तरुणाने रेडिटवर म्हटलं आहे की, फॅमिली ग्रुपमध्ये टाकलेल्या फोटोंमध्ये त्याच्या पत्नीचा एक न्यूड फोटोदेखील होता. तरुणाची पत्नी हॉट टबमध्ये उभी होती आणि ती पूर्णपणे न्यूड होती. पण हा फोटो खूप लांबून काढण्यात आला होता. बाथटबमध्ये असल्याकारणाने तिच्या कंबरेपर्यंत पाणी होते. ही गोष्ट खूप लाजिरवाणी होती पण तो फोटो खूप जास्त अश्लील नव्हता. कारण पत्नीचे शरीर पूर्णपणे या फोटोत दिसून येत नव्हते, पण फॅमिली ग्रुपमध्ये असा फोटो शेअर केल्याने दोघांनाही लज्जस्पद वाटत होते. 


दरम्यान, या प्रकारानंतर तरुणाने कानाला खडा लावला आहे. त्याच्या हलगर्जीपणामुळं सगळ्यांसमोर शरमेने मान झुकवावी लागली, त्यामुळं यापुढं कोणालाही फोटो पाठवत असताना दोनदा चेक करणार आहे. त्यानंतरच फॅमिली ग्रुपमध्ये फोटो शेअर करणार आहे. तरुणाच्या रेडिट पोस्टवर युजर्सने भरभरुन कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी त्यांची खिल्लीही उडवली आहे. तर, काही युजर्ननी तो निष्काळजी असल्याचे म्हटलं आहे.