मुलीच्या मैत्रीणीवरच जडलं प्रेम, पत्नीने असा शिकवला धडा
कोणत्याही नातेसंबंधात फसवणुकीचा चांगला परिणाम होत नसतो. विशेषत: जर ही फसवणूक पती -पत्नीच्या नात्यात असेल तर.
मुंबई : नातं हे विश्वासावर अवलंबून असतं. कोणत्याही नातेसंबंधात फसवणुकीचा चांगला परिणाम होत नसतो. विशेषत: जर ही फसवणूक पती -पत्नीच्या नात्यात असेल तर. अशा परिस्थितीत जेव्हा एका मुलीला तिच्या वडिलांचे अफेअर तिच्याच मैत्रिणीसोबत असल्याचे कळते. तेव्हा तिला किती धक्का बसला असेल.
मिरर यूकेच्या वृत्तानुसार, डायना नावाच्या मुलीने तिच्या वडिलांच्या अफेअरचा टिकटॉकवर खुलासा केला. तिने सांगितले की, त्यांचे कुटुंब एक रेस्टॉरंट चालवते ज्यामध्ये तिची मैत्रिण ग्रेचिन काम करत होते. पण सुरुवातीला डायनाला माहिती नव्हती की तिच्या मैत्रिणीचे तिच्याच वडिलांसोबत अफेअर चालू आहे.
वास्तविक, डायना आणि ग्रेटचिन यांच्यात चांगली मैत्री होती. ग्रेटचिन डायनापेक्षा तीन वर्षांनी मोठी होती. पण ग्रेटचिनचे डायनाच्या वडिलांशी प्रेमसंबंध होते. डायना म्हणते की "एकेकाळी मला वाटले की तिचा माझ्यावर प्रेम आहे पण मी नकार दिला, म्हणून तिने माझ्या वडिलांसोबत नातं जोडलं.
डायनाच्या आईला माहिती होती की तिचा पतीचं दुसर्या महिलेशी अफेअर आहे. पण ती स्त्री दुसरी कोणी नाही तर ग्रेचिन आहे. हे तिला माहित नव्हतं.
तिचे वडील आईला ग्रेचिनसाठी सोडत आहेत हे कळल्यावर डायनाला राग आला. अशा परिस्थितीत तिने संपूर्ण घटना सोशल मीडियावर शेअर केली. त्याच वेळी, डायनाच्या आईने तिच्या पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. नंतर तिने पुन्हा लग्न केले आणि नवं आयुष्य सुरु केलं.