नवी दिल्ली : सॉक्सचा वास अगदी नकोसा होतो. आणि तो जर दुसऱ्याच्या सॉक्समधून येत असेल तर जास्तच त्रास होतो. प्रवासात असे काही झाले तर...? तुम्ही काय कराल...? नाकाला रुमाल धराल किंवा शक्य असल्यास तुमची बसण्याची जागा बदलाल. मात्र त्यामुळे कोणी कोणावर चाकूने हल्ला केल्याचे तुम्ही ऐकले आहे ? पण असा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रूसमध्ये एका फ्लाईटमध्ये दुर्गंधी सॉक्सवरून सुरू झालेला वाद चाकू हल्लापर्यंत गेला.


काय आहे हा प्रकार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्टनुसार, हा प्रकार काही आठवड्यांपूर्वी प्रकाशात आला. रूसच्या मॉस्को ते कैलिनिनग्राद पर्यंत जाणाऱ्या एका फ्लाईटमध्ये ५६ वर्षांचे एक गृहस्थ प्रवास करत होते. त्याच्या बाजूच्या सीटवर ३१ वर्षांचा तरूण बसला होता. फ्लाईट सुरू झाल्यावर तरूणाने बुट-सॉक्स काढून ठेवले. त्यातून दुर्गंधी येत असल्याने बाजूच्या गृहस्थाने ते त्याला वुट परत घालण्यास सांगितले. 


तरूणाने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ते गृहस्थ चिडले व त्यांच्यात वादाला तोंड फुटले. त्यांचा वाद आवरण्याचा फ्लाईटमधील स्टाफने प्रयत्न केला. मात्र फ्लाईट लॅंड झाल्यावर दोघे विमानतळावरील पार्कींच्या गर्दीत गेले आणि तिथे त्यांच्यात मारहाण झाली.


याचदरम्यान त्या चिडलेल्या गृहस्थाने तरूणाच्या छातीत चाकूने वार केले. त्यामुळे तो गंभीररीत्या जखमी झाला. डॉक्टारांनी दिलेल्या माहितीनुसार, तरूणाच्या हृदयाला देखील त्याने नुकसान पोहचले.


आरोपीला होणार शिक्षा...


याप्रकरणी स्थानिक पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर यासाठी आरोपीला १० वर्षांची शिक्षा होऊ शकते.