Trending News In Marathi:  एका 60 वर्षीय व्यक्तीने चमत्कारित अनुभव शेअर केला आहे. ब्रिटनमध्ये स्टेज अॅक्टर म्हणून काम करत असताना त्याला एक भयंकर अनुभव आला. या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मात्र 7 मिनिटांनंतर तो पुन्हा जिवंत झाला. त्या 7 मिनिटांच्या काळात तो कुठे होता व काय करत होता याबाबत त्यांने सविस्तर भाष्य केले आहे. या अनुभवांना आफ्टर लाइफ एक्सपीरियंस किंवा NDE (निअर डेथ एक्सपीरियंस) असंही म्हटलं जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवने त्याच्या या अनुभवाबाबत सविस्तर भाष्य केले आहे. 9 फेब्रुवारी 2013मध्ये हार्टअॅटेक आला होता. त्यावेळी ती लंडन येथील त्यांच्या घरात पत्नीसोबत जेवण करत होते. जेव्हा त्याना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा त्यांच्या पत्नीने एलिसनने रुग्णवाहिकेला फोन केला होता. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. शिवचा मृत्यू झाला होता. त्यांना वेळेत उपचार मिळाले होते. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर ते पुन्हा जिवंत होतील असं कोणालाच वाटलं नव्हतं. 


न्यूयॉर्क साइटमध्ये त्यांच्या या अनुभवाबद्दल सांगण्यात आलं आहे. शिवने म्हटलं आहे की, मला कळलं होतं की माझं निधन झालंय. माझ्या शरीरातून सगळं काही निसटत चाललंय याची जाणीव मला होत होती. हा अनुभव शब्दांत मांडण्यात येत नाहीये. मला असं वाटतं होतं की मी झिरो आहे. मात्र मी अजूनही भावना आणि संवेदना अुनभवू शकतो. मला पाण्यात पोहोत असल्यासारखं वाटत होतं. तुम्ही निवांत आहात आणि भौतिक जगापासून दूर आहेत. यावेळी तर मी चंद्रावर फेरफटका मारत होतो आणि पूर्ण अंतराळ पाहू शकतोय, अशी जाणीव होत होती. 


शिव यांनी पुढे म्हटलं आहे की, विभिन्न जीवन आणि पुनर्जन्म हे पूर्ण माझ्या अवतीभवती फिरत आहेत. पण मला हे सगळं नको होतं. मला पुन्हा माझ्या विश्वात परत जायचं होतं. मला माझे शरीर हवे होते. माझी पत्नी माझी वाट पाहत होती, मला जगायचे होते. त्यानंतर माझ्या घरी रुग्णवाहिका आली आणि डॉक्टरांना पुन्हा माझ्या हृदयाचे ठोके सुरु करण्यात यश आले. माझ्यावर एक शस्रक्रियादेखील करण्यात आली. एकदा मरण अनुभवल्यानंतर आता आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोनच बदलला आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. 


त्यांनी पुढे म्हटलं आहे की, मी आता मरणाला घाबरत नाही. पण त्याचबरोबर मी जास्त भयभीत आहे. कारण मला आता हे उमगलंय की माझ्या आयुष्यात जे काही आहे ते किती किमती आहे. मी इथे जन्म घेण्यासाठी अभार मानतो.