हनिमूनच्या दिवशी `ती` चुक महागात पडली, तरूणाचा दुदैवी मृत्यू
धोक्याचा इशारा माहीत असूनही दुर्लक्ष केलं आणि हनिमूनच्या दिवशीच घात झाला
ब्रिटन : एका नवीन जोडप्याच्या आयुष्यातील सुवर्णक्षण म्हणजे हनिमून. मात्र हाच हनिमून जर जोडप्यातील एका व्यक्तीचा शेवटचा दिवस ठरला तर, मोठा हादरा बसेल ना. असाच धक्का या घटनेत एका नव्य़ा नवरीला बसला आहे. हनिमुनच्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय.या घटनेने नवरीसह तिच्या कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे.
ब्रिटनमधलं असलेले नवीन लग्न झालेले कपल थायलंडच्या फुकेत बेटावर हनिमूनसाठी गेले होते. दोघेही या हनिमूनसाठी खुपच उत्साहात होते.सगळं काही आनंदात होत. दोघांनाही हनिमुनच्या रात्रीची उत्सुकता लागली होती.मात्र नवीन नवऱ्याने केलेली ती चूक त्याला खुपचं महागात पडली. विशेष म्हणजे ती चुक करताना त्याला धोक्याचाही इशाराही मिळाला होता. मात्र या इशाऱ्याकडे त्यांने दुर्लक्ष केल्याने मोठा घात झाला.
नवं कपल थायलंडमध्ये हनिमून एन्जॉय करत होते. हनिमून एन्जॉय करण्यासाठी नवं कपलं मस्त अशा समुद्रकिनारी असलेल्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. हनिमूनपूर्वी नवऱ्याने या समुद्रात पोहोण्याचा आनंद लुटण्याचा प्लॅन आखला होता. त्यानुसार तो समुद्रात उतरला. मात्र समुद्रात आंघोळ करत असताना त्याचा अपघात झाला. या अपघातात त्यांला जीव गमवावा लागला. अली मोहम्मद मियाँ असे या मृत नवऱ्याचे नाव आहे. या घटनेनंतर पत्नीवर दु:खांचा डोंगर कोसळलाय.
धोक्याचा इशाराच समजलाचं नाही
अली समुद्रात पोहोताना मनसोक्त आनंद लुटत होता. आनंदाच्या भरात त्याने समुद्रातल्या वॉर्निंग लाइनकडे दुर्लक्ष केले होते. आणि हीच चुक त्याला महागात पडली. वॉर्निंग लाइनकडे दुर्लक्ष करत पोहोत असल्याने तो समुद्रात वाहून गेला. त्याच्यासोबत एक ५५ वर्षीय स्थानिक व्यक्तीही होता तो देखील वाहून गेला.
मीडियाच्या वृत्तानुसार, पोलीस अधिकाऱ्याने अलीच्या मृत्यूची बातमी ब्रिटिश दूतावासाला दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, आम्हाला संध्याकाळी ५ वाजता इमर्जन्सी कॉल आला होता. आमच्या माणसांनी समुद्रातून दोन जणांची सुटका केली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. तसेच पोलिस अधिकारी पुढे म्हणाले की, समुद्रात 'वॉर्निंग साइन्स' बनवण्यात आले होते, परंतु दुर्दैवाने दोघांनी ते ओलांडले. मुसळधार पावसामुळे तो समुद्राच्या लाटांमध्ये अडकला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान या घटनेने नव्या नवरीसह तिच्या कुटूंबियावर दु:खाचा डोंगर कोसळलाय.