मुंबई : तुम्ही लोकांना बऱ्याचदा बोलताना ऐकलं असणार की, रेड वाईन पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे तुमची त्वचा चमकदार होते आणि शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात. पण तुम्ही कधी ऐकले आहे की, स्वतःचे लघवी पिण्याचे देखील अनेक फायदे आहेत? ही गोष्ट नक्कीच तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते. परंतु एका व्यक्तीने हा दावा केला आहे की, स्वतःचे लघवी पिऊन तो पूर्वीपेक्षा अधिक तरुण झाला आहे. एवढेच नाही, तर लघवी प्यायल्याने डिप्रेशनच्या समस्येपासून मुक्ती मिळते असा दावाही या व्यक्तीने केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेली मेलच्या वृत्तानुसार, हॅम्पशायर, ब्रिटनमधील फर्नबरो हॅरी मॅटाडीन असे या व्यक्तीचे नाव आहे. जो रोज स्वत:चे मूत्र पितो आणि गेल्या 6 वर्षांपासून तो हे करत आहे आणि त्याचा दावा आहे की, लघवी प्यायल्याने त्याला बरे वाटते, म्हणून तो दररोज लघवी पितो.


हॅरीचा दावा आहे की, ते वृद्धत्वविरोधी गुणधर्मांमुळे शरीराला मॉइश्चरायझ करते.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, 33 वर्षीय हॅरी मॅटेडिन दररोज 200ML मूत्र पितो. सुरुवातीला त्याला ही हे करणं खूप वाईट वाटायचं, पण आता त्याला ती आवडू लागली आहे. हॅरीचा असा विश्वास आहे की, तो पूर्वीपेक्षा अधिक निरोगी, आनंदी आणि हुशार आहे.


त्याने दावा केला आहे की, लघवी प्यायल्याने आलेले नैराश्य बरे झाले आहे. 



हॅरीने 'पॉवर ऑफ एजड युरिन थेरपी' या विषयावर दोन पुस्तकेही लिहिली आहेत. त्याच वेळी, लोकांना त्याच्या उपचार क्षमतांबद्दल मोकळ्या मनाने जाणून घ्यायचे आहे. हॅरीने लिहिलेले पुस्तक हे सर्वात शक्तिशाली औषध असल्याचे आवर्जून सांगतो जे मोफत उपलब्ध आहे.


हॅरी  मॅटेडिनने त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. परंतु त्याने सांगितले की, त्याच्या वडिलांनी त्याच्या डायरीत मेसेज लिहून शिवीगाळ केली. हॅरीच्या वडिलांनी लिहिले, 'स्वतःचे मूत्र पिणे बंद करा. ते खूप दुर्गंधीयुक्त आहे, सामान्य माणसांप्रमाणे तुही लघवी करण्यासाठी शौचालयाचा वापर कर.


या पोस्टवर हॅरीने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'बाबा माझ्या डायरी अशा प्रकारे खराब करत आहेत.'