मुंबई : सध्या सेल्फीचे युग आहे. लोकांना आपला स्वत:चा फोटो काढायला फार आवडते. त्यामुळेच तर तुम्हा तुमच्या आजूबाजूला असा एक तरी व्यक्ती दिसेल की, जो सेल्फी घेत असेल. हे पाहायला किंवा करायला मजेदार वाटत असलं तरी ते खूप धोकादायक देखील आहे. यामुळे अनेकांचे प्राण गेले असल्याच्या देखील बातम्या समोर आल्या आहेत. सेल्फी प्रेमात लोक इतके बुडालेले असतात की, त्यासाठी ते आपल्या जीवाची पर्वा देखील करत नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असाच एक प्रकार एका व्यक्तीसोबत घडला आहे. ज्याने सेल्फीच्या नादात सगळी हद्दच पार केली. हा व्यक्ती इटलीला राहणारा आहे. जिथे एक पर्यटक सेल्फी घेण्यासाठी ज्वालामुखीजवळ पोहोचला. तेव्हा सेल्फी घेताना त्याचा मोबाईल ज्वालामुखीच्या विवरात पडला. तेव्हा फोन वाचवण्याच्या नादात हा व्यक्तीचा देखील तोल गेला आणि...


आता तुम्ही फक्त विचार करा. या व्यक्तीचं पुढे काय घडलं असेल? तुमच्या मनात हेच आलं असेल की, हा व्यक्ती आता गेला. त्याचा मृत्यू अटळ आहे आणि त्याला कोणीही वाचवू शकत नाही.


परंतु असे काहीही घडले नाही. हा व्यक्ती इतका नशिबवान होता की, त्याला काहीही झाले नाही. उलट ज्वालामुखीने या व्यक्तीला बाहेर फेकले. ज्यामुळे तो आता सुरक्षित आहे.


वास्तविक, ही घटना इटलीतील माउंट वेसुवियस नावाच्या ज्वालामुखीजवळ घडली आहे. लाइव्ह सायन्सने दिलेल्या वृत्तानुसार, 23 वर्षीय अमेरिकन पर्यटक येथे भेट देण्यासाठी आला होता. त्याला काय वाटले ते कळेना, ज्वालामुखीजवळ पोहोचल्यानंतर त्याने सेल्फी घेण्याचा प्रयत्न सुरू केला. ज्वालामुखीच्या तोंडाजवळ उभं राहून सेल्फी घेत असताना त्याचा पाय घसरल्याने ती व्यक्ती थेट ज्वालामुखीच्या आत पडली. त्याचा फोन उचलायचा असताना हा प्रकार घडला.


हा पर्यटक आपल्या तीन नातेवाईकांसह इटलीला गेला होता, असेही सांगण्यात आले. सध्या तो सुखरूप परतला आहे.