China Father: लहान मुलं हट्ट करतात कधी कधी चुकीचं वागतात अशावेळी पालक त्यांना लाडीगोडी लावून किंवा दमदाटी करुन त्यांची समजून घालतात. मात्र अलीकडेच एका वडिलांनी आपल्या तीन ते चार वर्ष असलेल्या मुलीला भयंकर शिक्षा दिली आहे. एका क्षुल्लक गोष्टीसाठी बापाने लेकीला आमानुष वागणूक दिली आहे. बाप-लेकीच्या हळव्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक विकृत बाप आपल्या तीन ते चार वर्षांच्या मुलीला बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून उलटं लटकवले आहे. मुलगी भितीने भेदरुन गेली आहे. मात्र बापाच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. हात सटकला असता तर मुलगी थेट इमारतीवरुन खाली पडली असती व तिचा जीवही जाऊ शकला असता. मात्र, हैवान बापाच्या मनात तिची काळजीही दाटून आली नाही. या घटनेने सगळेच सून्न झाले आहेत. 


साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या एका बातमीनुसार, ही घटना चीनच्या लिअनिंग प्रांतातील आहे. व्हिडिओत एका व्यक्तीने  चिमुकलीला पायांना पकडलेले आहे आणि ती खिडकीत लटकत आहे. मुलगी जोरजोरात किंचाळत आहे आणि तिने इमारतीच्या भिंतींना पकडून ठेवले आहे. ती सारखी वडिलांना मदतीसाठी हाका मारत होती. ती वारंवार तिला वाचवण्यासाठी त्यांना हाका मारत होती. मात्र तिच्या ओरडण्याचा त्यांच्यावर काहीच फरक पडत नव्हता. त्याने तिला खिडकीतून लटवकवले होते आणि सतत तिला शांत बसण्यास दटावत होता. 


या नराधम पित्याने पोटच्याच लेकीसोबत असा प्रकार का केला हे वाचून तुम्हालाही धक्का बसेल. व्हिडिओतच तुम्हाला यांचे कारण समजणार आहे. व्हिडिओत वडिल मुलीला मोठ्यामोठ्याने ओरडत होते. तु बाथरुममध्ये लघवी का नाही केलीस? टॉयलेटमध्ये जाण्याऐवजी तु तुझ्याच खोलीत लघवी का केलीस?, असं हा व्यक्ती बोलत होता. जवळपास तीन मिनिटे ती चिमुरडी तशाच अवस्थेत होती. 


मुलीचा आरडाओरडा आणि बापाचा आवाज ऐकून शेजारी बाहेर आले. मुलीला अशाप्रकारे हवेत लटकत असलेले पाहून त्यांनाही धक्का बसला. त्यांनीही बापाला समजवायचा प्रयत्न केला. मात्र त्याने कोणाचच ऐकले नाही. शेजारी त्यांला तिला वर घ्यायला सांगत होते. तसंच कोणीतरी त्याला तु वेडा आहेस का? तिला घरात घे, असं सांगितले. मात्र तरीही त्याने कोणचाच ऐकलं नाही आणि मुलीला ओरडत राहिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे.