Viral Video:सोशल मीडियावर आपण अपघाताचे अनेक व्हिडीओ पाहतो. काही व्हिडीओ फार भयानक असतात. ते पाहून अंगावर काटा उभा राहतो. मराठीमध्ये एक म्हणं आहे, काळा आला पण वेळ आली नव्हती, असे प्रत्यय देणारे अनेक अपघाताचे व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहे. भीषण आणि भयानक अपघातातून अनेक लोकांचे प्राण वाचले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. जाको राखे साइयां, मार सके न कोई...ज्याचं नशीब बलवत्त असेल त्याला यमराज पण हात लावू शकत नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका लहान मुलीसोबत दुर्घटना घडणार होती, पण एका देव माणसाने तिला वाचवलं. हा व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो. 



काय घडलं नेमकं?


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्याचा कडेला काही लोक गप्पा मारत आहेत. अचानक एक लहान मुलगी वेगाने सायकलवरुन त्यांना येताना दिसली. तिचा सायकलवरील नियंत्रण सुटलं होतं ती विजेच्या खांबाला धडकणार होती पण. हे भयानक दृष्य पाहून थक्क व्हायला होतं. 



तो ठरला देवदूत 


त्या घोळक्यातील एक व्यक्ती मुलीला सायकलवरुन उचलून घेतो आणि तिचा जीव वाचवतो. सोशल मीडियावरील ट्विटरवर @nxtfukinglevel नावाच्या अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 2 लाखांपेक्षा लोकांनी लाइक केला आहे.