सिगरेट पिऊन हळदीसारखं पिवळ झालं शरीर, नेमका काय प्रकार
या व्यक्तीचं अंग पिवळं का पडलं नेमकं या व्यक्तीसोबत काय घडलं वाचा सविस्तर
मुंबई: सिगरेट पिण्यामुळे फुफ्फुसांना त्रास होतो हे माहीत असूनही सिगरेट पिण्याचं प्रमाण कमी होत नाही. त्यामुळे होणारे धोके लक्षात घेऊनदेखील अनेकदा सिगरेट घेतलीच जाते. या सिगरेटमुळे एका व्यक्तीचं शरीर पिवळं पडल्याचं धक्कादायक घटना समोर आली आहे.
या घटनेमुळे डॉक्टरही हैराण झाले. सतत सिगरेट घेतल्यानंतर या तरुणाचं शरीर पिवळ्या रंगाचं पडल्याचं दिसून आलं. हा व्यक्ती 30 वर्षांपासून धुम्रपान करत असल्याचं समोर आलं आहे. 27 जानेवारीला त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
चीनच्या सोशल मीडियावर या व्यक्तीचा फोटो व्हायरल होत असल्याची माहिती मिळाली आहे. 27 जानेवारीला त्याला चीनी शहर हुआयेनच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यावेळी त्याची त्वचा पूर्ण पिवळी झाली होती.
रुग्णालयातील डॉक्टरांनी चाचण्या केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली. स्वादुपिंडामध्ये ट्यूमर झाला होता. त्यातच कावीळ झाली आणि व्यक्तीचं शरीर पिवळं पडलं. शरीरात बिलरुबिन तयार झालं लाल रंगाच्या पेशींमध्ये गडबड झाली.
रात्रभर कुत्रा बिबट्यासोबत असूनही सुरक्षित, पाहा PHOTOS
डॉक्टरांच्या मते अति धुम्रपान केल्यामुळे ट्यूमर झाला. शरीरात बिलरुबिन वाढल्यानं अंग पिवळ्या रंगाचं झालं. तर डोळ्यांचा रंगही पिवळा झाला होता. सध्या या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या व्यक्तीला झालेला ट्यूमर खूपच घातक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यामुळे शस्त्रक्रिया करून तो ट्यूमर काढण्यात आला. त्यानंतर या रुग्णावर उपचार करून शरीरातील पिवळेपणा कमी करण्यात आला आहे.