न्यूजर्सी : आयुष्यात माणूस असे काही निर्णय घेतो ज्यामध्ये तो स्वत:च फसतो आणि त्यातून पुढे नवीन अडचण निर्माण होते. प्रत्येक वेळी घेतलेला निर्णय योग्य असेल असं नाही. बऱ्याचदा असे निर्णय फसल्यानंतर होणारा मानसिक त्रास जास्त असतो. बऱ्याचदा परिस्थितीपासून पळ काढण्यासाठी माणूस आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतो. हा प्रयत्न काही वेळा यशस्वी होतोच असं नाही. आयुष्यात पुन्हा उभं राहण्याची संधी आपल्याला मिळत असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असाच एक प्रकार न्यू जर्सीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत घडला. या व्यक्तीनं इमारतीच्या नवव्या मजल्यावरुन उडी मारली. आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेत ही उडी मारली. मात्र त्याचा मृत्यू झाला नाही. ती व्यक्ती खाली खाली उभ्या असलेल्या बीएमडब्ल्यू कारवर पडली. त्यानंतर, कार आणि व्यक्तीची स्थिती पाहून तिथल्या नागरिकांमध्ये खळबळ उडाली. 




तिथल्या काही नागरिकांच्या मते इतक्या उंचावरून तरुणाने उडी मारल्यानंतर हा व्यक्ती गंभीर जखमी झाला. मात्र त्याचा मृत्यू झाला नव्हता. तर तो ज्या BMW कारची पूर्ण वाट लागली होती. तिचा चुराडा झाला होता. या गाडीची अवस्था दाखवणारे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. हा व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 


स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीने 9 व्या मजल्यावरून उडी मारली. हा व्यक्ती थेड खाली उभ्या असलेल्या BMW कारवर कोसळला. तो गंभीर जखमी झाला त्याच बरोबर गाडीचाही चुराडा झाला आहे. लाखो रुपयांच्या गाडीची अवस्था बिकट झाली. काचा फुटल्या या घटनेनंतर गाडीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.