बिजिंग: रुग्णवाहिका म्हटलं की आपल्या काळजात धडकी भरते. एकतर अंत्यविधी किंवा रुग्णालाय अशा दोनच गोष्टी डोळ्यासमोर येतात. मात्र एका व्यक्तीनं रुग्णवाहिका आणि आयोग्य विभागालाच चुना लावला आहे. रुग्णवाहिकेचा गैरवापर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं काहीवेळा होतं की गरजूंना रुग्णवाहिका मिळत नाही. पण एका व्यक्तीने रुग्णवाहिकेला बाजारपेठेत जाण्याचे वाहन म्हणून वापरलं आहे. व्यक्तीनं सरकारी रुग्णवाहिका फक्त बाजारात जाण्यासाठी बोलवली. एकदाच नाही तर तब्बल 39 वेळा अशा प्रकारे रुग्णवाहिका बोलवल्याची माहिती मिळाली आहे. 


या प्रकरणात अखेर पोलिसांना लक्ष घालावं लागलं. त्यांनी या तरुणावर कारवाई केली आहे. ताइवान इथे ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरुण 200 मीटर घरापासून सुपरमार्केटमध्ये जाण्यासाठी सरकारी रुग्णवाहिका बोलवली.


मागचा रेकॉर्ड तपासल्यानंतर लक्षात आलं एकदा नाही तर 39 वेळा अॅम्ब्युलन्स मोफत बोलवल्याची धक्कादायक घटना समोर आली. या तरुणाने रुग्णवाहिकेचा वापर टॅक्सीसारखा केला. असं करण्यामागे व्यक्तीला पोलिसांनी कारण विचारलं. त्याने दिलेलं कारण ऐकून पोलीसही चक्रावले.


तैवानच्या नांटू काउंटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वांग नावाचा व्यक्ती वारंवार आजारी पडत असल्याच्या बहाण्याने त्याला त्याच्या घराजवळील रुग्णालयात पाठवण्यासाठी रुग्णवाहिका बोलावण्यात आली. प्रत्येक वेळी डॉक्टरांना न भेटता वांग तिथून पळ काढायचा. 


हा प्रकार पाहून वैद्यकीय कर्मचारी वैतागले आणि त्यांनी अखेर हा सगळा प्रकार पोलिसांच्या कानावर घातला. त्यानंतर पोलिसांनी याचा छडा लावताच हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.