नवी दिल्ली : Afghanistan Crisis : तालिबानने (Taliban) काबूल शहरावर ताबा मिळवत अफगाणिस्तानचा (Afganistan) पाडाव केला. आता तेथील परिस्थिती भयानक आहे. लोक दहशतीच्या छायेखाली आहेत. आपल्याच देशातून ते बाहेर पडण्यासाठी धडपड करत आहेत. मात्र, विमानाशिवाय दुसरा मार्ग नसल्याने त्यांच्या पदरी प्रतिक्षाच आहे. दरम्यान, अफगाणिस्तानातून 130 भारतीयांना घेऊन जाणारे C-17 ग्लोबमास्टर विमान गुजरातच्या जामनगर विमानतळावर उतरले. त्यानंतर, विमान दिल्लीच्या दिशेने निघाले आहे. (Situation in  Afghanistan)


Afghanistan Crisis : काबूलहून 130 भारतीय मायदेशात परतले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक भारतीय अडकले आहेत ते घरी परतण्याच्या प्रतीक्षेत. ते दिल्लीच्या फ्लाइटची वाट पाहत आहेत पण त्यांना घरी परतण्याचा मार्ग दिसत नाही. विमानतळाबाहेर 4 लाख लोक आहेत, ज्यांना देशाबाहेर जाण्यासाठी विमान पकडायचे आहे. विमानतळाच्या आत चोर आणि दरोडेखोर फिरत आहेत. यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, विमानतळावरुन व्यावसायिक, प्रवासी विमानांची उड्डाणे बंद करण्यात आली आहेत. विमानतळावर लुटमार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती काबूल विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. 



अफगाणिस्तान हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Hamid Karzai Airport) अतिशय भयावह परिस्थिती दिसून येत आहे. विमानतळावर प्रवेश मध्यभागी भयंकर गोंधळ आणि तानावाची स्थिती आहे. एकच गोंधळाचे वातावरण आहे. त्यामुळे अमेरिकन सैनिकांना हवेत गोळीबार करवा लागला आहे. गोंधळानंतर हमीद करझाई विमानतळअवरुन कमर्शियल, ओव्हरसीज विमानतळ विमानतळ बंद करण्यात आले आहेत. अफगाणिस्तान विमानतळ बंद झाल्यामुळे अनेक अफगाणी नागरिक येथे अडकलेले आहेत.