वाश्गिंटन : फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्या बहिणीसोबत अलास्का एअरलाइन्सच्या विमानात छेडछाडीचा प्रकार घडला.


घडलेला प्रकार सोशल मीडियावर शेअर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रँडी झुकरबर्ग यांनी घडलेला प्रकार सोशल मीडियावर शेअर करत छेडछाडीचा आरोप केला आहे. प्रवाशी छेडत असूनही फ्लाइट अटेंडंटने त्याला रोखलं नाही, अशी रँडी यांची तक्रार आहे. त्यांच्या तक्रारीवर अलास्का एअरलाइन्सने चौकशीही सुरू केली आहे.


रँडी यांनी सिएटल येथील या एअरलाइन्सच्या अधिकाऱ्याला पत्र लिहिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, 'माझ्या शेजारी बसलेला प्रवासी माझ्यावर आणि अन्य प्रवाशांवर वाईट बोलत होता. हस्तमैथुनाबद्दल बोलत होता. अन्य महिला प्रवाशांबद्दलही तो अश्लील वक्तव्य करत होता.'


फ्लाइट अटेंडंटकडे रँडी यांनी याविषयी तक्रार केली. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. कारण फ्लाइट अटेंडंटने या प्रकाराकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले. तो प्रवासी या रुटने नेहमी प्रवास करत असून त्रास होत असल्यास मागच्या बाजूची सीट देण्याची तयारी दाखवली.



एअरलाइन्सने दिले आश्वासन


यासंदर्भात रँडी यांनी एअरलाइन्सशी संपर्क केला. चौकशी करून दोषी आढळल्यास आरोपी प्रवाशाचे विशेषाधिकार रद्द करण्यात येतील, असे आश्वासनही एअरलाइन्सने दिले आहे.