एका लग्नाची एक विचित्रच घटना समोर आली आहे. दोघांनी साता जन्माच्या गाठी बांधल्या. नातेवाईकांसमोर एकमेकांच्या गळ्यात हार देखील घातली. मात्र लग्नाच्या दहा महिन्यानंतर पत्नीला पतीचं जे गुपित कळालं ते एकूण तिला मोठा हादराच बसला. ज्या व्यक्तीसोबत ती इतकी वर्ष राहत होती, त्या व्यक्तीने तिच्यासोबत फार मोठी फसवणूक केली होती.  हे प्रकरण पोलीस ठाण्यात (Police station) पोहोचल्यावर घटनेचा उलगडा झाला. 


डेटिंग अ‍ॅपवर जुळलं 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक डेटींग अ‍ॅपवर (Dating App) दोघांची ओळख झाली होती. या अ‍ॅपवर तिचा होणारा नवरा पुरुषाप्रमाणेच वावरत होता. एका सर्जन सोबत त्याचा बिझनेस असल्याचंही त्याने तिला सांगत होता. तसेच त्याने धर्मपरीवर्तन केला असून तो जोडीदाराच्या शोधात असल्याची फुस त्याने तिला लावली होती. अशी साधारण तीन महिने या दोघांमध्ये डेटींग अॅपवर चर्चा चालली. या चर्चेनंतर दोघांमध्ये चांगली ओळख झाली आणि पुढे जाऊन त्यांनी एकमेकांशी लग्नगाठ बांधली. 


मुलीच्या कुटुंबियांना संशय आला 


लग्न झाल्यानंतर दोघांनी मुलीच्या घरातच म्हणजेच माहेरी संसार थाटला. लग्नाच्या काही दिवसानंतर मुलीच्या कुटुंबियांना जावईबापूवर संशय आला. कारण तो त्यांच्या मुलीकडे सतत पैसे मागायचा. तसेत त्याच्या बिझनेस बाबतच्या असंख्य गोष्टी तो लपवायचा. त्यामुळे कुटुंबियांना त्याच्यावर संशय बळावत होता. 


पत्नीला डांबून ठेवलं


माहेरच्यांचा संशय जास्त वाढताना पाहून पती आपल्या पत्नीला घेऊन भाड्याच्या घरात राहायला गेला. या भाड्याच्या घरात त्याने आपल्या पत्नीला डांबून ठेवलं. तिला कुणाशीही बोलून दिलं नाही. तिच्या आई-वडिलांना देखील तिच्यासोबत बोलण्यास नकार दिला. पतीकडून पत्नीवर होणार हा छळ पाहून तिच्या आई वडिलांनी पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी पतीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतलं. यावेळी पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता सर्व भांडाफोड झाला.  


ज्या व्यक्तीला महिला इतकी वर्ष पती समजत होती, तो पुरूष नसून महिला असल्याचं तपासात उघड झालं. हा प्रकार एकूण महिलेसह तिच्या आई-वडिलांच्या पायाखालची जमीनचं सरकली होती.पुरूषाच्या वेशात वावरणाऱ्या या महिलेने दुसऱ्या महिलेला धोका देऊन तिच्यासोबत लग्न केलं. तसेच लग्नानंतरच्या दहा महिन्यात त्याने लाखो रूपयांचा गंडा देखील घातला. याप्रकरणी पोलिसांनी (पुरुषाच्या वेशात वारणाऱ्या) महिलेला ताब्यात घेतले. 


तसेच पीडित महिलेने पती विरोधात कोर्टात (court) धाव घेतली होती. सध्या या प्रकरणावर कोर्टात सुनावणी सुरु आहे. कोर्ट यावर आता (पुरुषाच्या वेशात वारणाऱ्या) महिलेला काय शिक्षा सुनावतेय, याकडे लक्ष लागले आहे.