न्यूयॉर्क : पहिल्या गणित तज्ज्ञ मरियम मिर्जाखान यांचं अमेरिकेत प्रदीर्घ आजारानं निधन झालं आहे. मरियम मिर्जाखान ४० वर्षांच्या होत्या. अनेक महिन्यांपासून त्या ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणित क्षेत्रातील प्रतिष्ठीत 'फील्ड्स मेडल' पुरस्कारनं मरियम मिर्जाखान यांना गौरवण्यात आलं होतं. 


‘फील्ड्स मेडल’ हा पुरस्कार गणित क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मानला जातो. मिर्जाखान यांना २०१४ मध्ये ‘कॉम्प्लेक्स जियोमेट्री अॅण्ड डायनामिकल सिस्टम्स’साठी या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.


मरियम यांचा जन्म १९७७ मध्ये इराणची राजधानी तेहरानमध्ये झाला. त्यांना तरुणपणी आंतरराष्ट्रीय मॅथेमॅटिकल ओलंपियाडमध्ये दोन सुवर्ण पदाकांनी गौरवण्यात आलं होतं. तर २००४ मध्ये हॉर्वर्ड विद्यापीठाने पीएचडी प्रदान केली होती.