भारतासह जगात गेल्या काही दिवसांपासून ब्रिटन (UK) चर्चेत आहे. आता ब्रिटनमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्रिटनमधील पेमब्रोकशायर (Pembrokeshire) येथील एका जुन्या फूड डिपार्टमेंट स्टोअरच्या इमारतीखाली 300 सांगाडे (skeleton) सापडल्याने खळबळ उडाली आहे. इमारतीखाली एवढ्या मोठ्या प्रमाणात सांगाडे आले कसे हे प्रत्येकजण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच वेळी, काही लोकांनी त्याला मोठे कबरीस्तान (Mass Grave) म्हटलं आहे. इमारतीत बांधकाम सुरू होते, त्यादरम्यान कामगारांना हे सांगाडे मिळाले आहेत. (300 male skeletons found under building in UK) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

द सनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पुरातत्व विभागाचे शास्त्रज्ञ (Archaeologists) घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे. 300 सांगाड्यांपैकी (skeleton) निम्मे अवशेष लहान मुलांचे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. इतिहासकारांचा असा विश्वास आहे की प्राचीन स्मशानभूमी (Cremation) 600 वर्षांहून अधिक जुनी आहे.


डाइफेड आर्केलॉजिकल ट्रस्टचे (Dyfed) पर्यवेक्षक अँड्र्यू शॉब्रूक (Andrew Shobbrook) म्हणाले की, "दफन करण्यासाठीचे हे एक अतिशय प्रतिष्ठित ठिकाण असावे. इथे शहरातील श्रीमंतांपासून सामान्य लोकांपर्यंत अनेकांना पाहू शकता. प्राचीन काळी या जागेचा वापर कसा केला जात होता याबद्दल शोध घेतला जात आहे."


वेल्श प्रिन्सच्या हल्ल्याचा इतिहास


उल्लेखनीय म्हणजे, 15 व्या शतकाच्या सुरुवातीला वेल्श प्रिन्स ओवेन ग्लिंडरने शहरावर आक्रमण केल्यानंतर या ठिकाणी सामूहिक कबर बांधण्यात आली असावी असा एक सिद्धांत आहे. मेलऑनलाइनच्या वृत्तानुसार, 18 व्या शतकापर्यंत ही जागा मृतदेह दफन करण्यासाठी वापरली जात असण्याची शक्यता आहे. अँड्र्यू शूब्रूक म्हणाले की, 1405 मध्ये ओवेन ग्लिंडरने शहरावर आक्रमण केले होते आणि मोठ्या संख्येने लोक मारले गेले होते.


दरम्यान, पुरातत्व शास्त्रज्ञांचे एक पथक या सांगाड्यांची तपासणी करत आहे. नंतर त्यांना जवळच्या योग्य ठिकाणी पुन्हा पुरण्यात येणार आहे. त्याचवेळी पुरातत्वशास्त्रज्ञ गेबी लेस्टर यांनी सांगितले की, मी स्वप्नातही विचार केला नव्हता की मी इतक्या मोठ्या प्रकल्पात सहभागी होऊ शकेन.