Tonga Earthquake: भयंकर! `या` ठिकाणी ज्वालामुखीच्या उद्रेकामागोमाग 7.3 रिश्टर स्केलचा भूकंप; त्सुनामीचाही इशारा
Earthquake : जवळपास 7.3 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या या धरणीकंपामुळं या परिसरात आता त्सुनामीचाही इशारा देण्यात आला आहे.
Earthquake in tonga : न्यूझीलंडपाशी असणाऱ्या दक्षिण पॅसिफिक महासागर परिसरामध्ये असणाऱ्या टोंगा येथे 11 नोव्हेंबर (शुक्रवारी) ला सायंकाळी साधारण 6 वाजण्याच्या सुमारास भयंकर भूकंप आला. जवळपास 7.3 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या या धरणीकंपामुळं या परिसरात आता त्सुनामीचाही इशारा देण्यात आला आहे. यूएस जियोलॉजिकल सर्वे (USGS) च्या माहितीनुसार टोंगा येथील नीयाफूच्या पूर्व- दक्षिणपूर्वेला भुकंपाचं केंद्र होतं. पृथ्वीच्या पृष्ठापासून साधारण 25 मीटर खोल अंतरापर्यंत तो जाणवला. (Massive Earthquake hits Tonga after volcano eruption)
भूकंप आल्यानंतर हाहाकार...
टोंगामघ्ये भूकंपाची सुरुवात झाल्याक्षणी सायरन वाजण्यास सुरुवात झाली. उंच स्थानांवर जाण्यासाठी नागरिकांनी धाव मारली. ज्यानंतर बचाव यंत्रणेनं नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. यंदाच्याच वर्षी जानेवारी महिन्यामध्ये या भागात ज्वालामुखीचा महाभयंकर उद्रेकही झाला होता. 100 वर्षांमध्ये आतापर्यंतचा हा सर्वात मोठा ज्लावामुखी होता. या उद्रेकामुळे संपूर्ण बेटावर राखेची चादर पसरली होती.
Global Carbon Budget 2022: जगाचा विनाश केवळ 9 वर्षे दूर! हे बाबा वेंगाचे भाकीत नसून शास्त्रज्ञांचा रिपोर्ट
टोंगा ज्लावामुखीच्या स्फोटामुळं पृथ्वीचा दोनदा हादरा बसला होता. कारण त्यातून निर्माण झालेल्या लहरींनी पृथ्वीची दोनदा प्रदक्षिणा मारली होती. सदर ज्वालामुखीच्या स्फोटामुळं नजीकच्या 8 हजार वर्ग किलोमीटर अंतरावरील समुद्रतळाचं चित्र पूर्णपणे बदललं. इतकंच काय, तर टोंगापाशी जाणारी समुद्री इंटरनेट केबलही यामुळं तुटली होती. जाणून आश्चर्य वाटेल, पण ही केबल समुद्राच्याही तळापासून खाली 100 फूट अंतरावर पुरण्यात आली होती. थोडक्यात ज्वालामुखीच्या स्फोटाचं केंद्र इतक्या खोलवर होतं.