मुंबई : धकाधकीच्या आयुष्यात असे काही प्रसंग किंवा परिस्थिती आपल्या समोर उभी ठाकते जी आयुष्याकडे पाहण्याचा आणि जगण्याचा पूर्ण दृष्टीकोनच बदलून जाते. परिणामी बऱ्याच अंशी जीवनशैलीमध्ये काही अमूलाग्र बदल घडून येतात. 'गोलकास्ट'ने असाच एक अनुभव पोस्ट करत एकता आजाराच्या उपचारामुळे वयोमानाच्या दृष्टीने अतिशय स्थूल असणाऱ्या एकता महिलेच्या आयुष्यात कशा प्रकारे सकारात्मक बदल झाला, यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तारा मॅकगिन्टी Tara McGinty असं त्या महिलेचं नाव असून, तिच्यावर disabling autoimmune diseaseचे उपचार सुरू होते, ज्यानंतर नेमके कोणते आणि कसे बदल झाले, याविषयी तिने माहिती दिली. लहानपणापासूनच खाण्य़ाच्या ताही वाईट सवयी तिला होत्या, ज्यामुळे अनेकदा तिची खिल्लीही उडवली जात असे. 


'पीपल'च्या वृत्ताचा हवाला देत प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार एकदा शाळेत असतेवेळी तिच्या अंगावर सॉस पडला. तेव्हा एका मैत्रीणीने तिला बदलण्यासाठी म्हणून टी- शर्ट दिलं. पण, ते ताराला बरंच घट्ट झालं. त्यानंतर ताराने शाळेत काहीही खाणं टाळलं. भूक मारुन ती शाळा सुटेपर्यंत उपाशी राहत आणि घरी गेल्यानंतर रात्री झोपेपर्यंत ती सतत काही ना काही खात राहत. तिच्या या सवयीमुळे पाहता पाहता ती स्थूल होऊ लागली. ज्यामुळे पुढे जाऊन याच स्थूलतेमुळे ती दिवसातील जास्तीत जास्त तास झोपतच असत. 


शरीरात वाढती स्थूलता परिणामी सांधेदुखीमध्ये बदलली. इतकच नव्हे तर, तारा तिच्या मुलांना मिठीही मारु शकत नव्हती. अखेर तिने या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत डॉक्टरांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर तिला Rheumatoid Arthritis  ऱ्हयुमॅटॉईड आर्थ्रीटीस झाल्याचं निदान झालं. ज्यामुळे ती पुढे जाऊन व्हीलचेअरला खिळण्याची शक्यताही डॉक्टरांनी वर्तवली. अखेर या एका प्रसंगाने तिला खडबडून जाग आली आणि तिने आपल्या स्थूलतेचा गांभीर्याने विचार केला. 


छाया सौजन्य- गोलकास्ट

स्थूलता कमी करण्याच्या दृष्टीने तिने काही महत्त्वाची पावलं उचलली आणि  Isagenix dietary supplementsना प्राधान्य देत प्रोटीन शेकला दूर सारलं. अवघ्या काही दिवसांमध्येच आपल्या शरीरात होणारे बदल तिला जाणवू लागले. नियमित व्यायाम, संतुलित आहाराच्या सवयी या साऱ्याची तिला फारच मदत झाली. ज्यामुळे सांधेदुखीच्या आजावरही नियंत्रण मिळवण्यात तिला यश मिळू लागलं. 


वाढतं वय पाहता सध्या त्य़ा दृष्टीने आतापासूनच केलेले बदल हे फायद्याचेच ठरत असून, आता आपल्या मुलांना मिठी मारण्यासही काहीच अडचण येत नाही. इतकच नव्हे, तर तेही मला सहजपणे मिठी मारू शकतात, असं म्हणत ताराने तिचा आनंद व्यक्त केला.