मुंबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना मागे  टाकत ' मी टू' या ऑनलाईन कॅम्पेनने 'पर्सन ऑफ द इयर' हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाईम मासिकाने बुधवारी सकाळी अमेरिकेमध्ये यंदाच्या ' पर्सन ऑफ द इयर'  या पुरस्काराच्या विजेत्याचं नाव घोषित केलं आहे. 


काय आहे  'Metoo' कॅम्पेन ? 


 लैंगिक अत्याचाराविरूद्ध आवाज उठवण्यासाठी 'Metoo' या मोहिमेची सुरूवात करण्यात आली होती.  निर्माते, दिग्दर्शक हार्वे वाईनस्टिन यांचे लैंगिक अत्याचार प्रकरण उघड झाल्यानंतर या कॅम्पेनची सुरूवात झाली. 
 


 जगभरामध्ये प्रसिद्धी  


 मी टू या ऑनलाईन कॅम्पेनमध्ये देशाच्या, वयाच्या, धर्माच्या भिंती पार करून अनेकींनी आपल्यावरील अत्याचाराविरूध आवाज उठवण्यासाठी पाऊल उचलले आहे. यामध्ये अनेक सेलिब्रिटींनीदेखील सहभाग घेतला होता. 


 
 कोणी केली सुरूवात  


  सामाजिक कार्यकर्त्या टॅराना बर्क यांनी २००६ मध्ये पहिल्यांदा ' मी टू' ही संज्ञा वापरली होती.  


 


कशी होते पुरस्काराची निवड 


जगभरातील प्रभावशाली व्यक्ती किंवा बातमीची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. त्याकरिता लोकांना ऑनलाईन व्होटिंग करावे लागते.