मुंबई : फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी (Mehul Choksi ) याला पुन्हा एकदा दणका मिळाला आहे. त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा जेलमधील त्याचा मुक्काम वाढला आहे. डोमिनिका ( Dominica) येथील उच्च न्यायालयाकडून (High Court) मेहुल चोक्सीला जामीन देण्यास नकार देण्यात आला आहे. मेहुल चोक्सीचे अपहरण करुन जबरदस्तीने डोमिनिकात नेण्यात आल्याचा दावा वकिलांनी केला होता. मात्र, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अँटिग्वामधून डोमिनिकामध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी मेहुल चोक्सी याला अटक करण्यात आली आहे. पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळ्यातील (Punjab National Bank scam)  आरोपी मेहुल चोक्सीला जामीन देण्यास डोमिनिकाच्या उच्च न्यायालयाकडून नकार देण्यात आला आहे. डोमिनिकाच्या उच्च न्यायालयात मेहुल चोक्सीच्या जामीन याचिकेवर सुनावणी झाली, तेव्हा न्यायालयाने चोक्सीला फ्लाइट रिस्कच्या कारणावरून जामीन देण्यास नकार दिला आहे.



मेहुल चोक्सीची तब्येत ठिक नाही. अशावेळी त्यांनी विमान प्रवास करु नये. कोणताही धोका पत्करु नये, असे म्हटले न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, चोक्सी याच्या वकिलांनी म्हटले आहे, करण्यात आलेली अटक बेकायदेशीर आहे. मेहुल चोक्सीचं अपहरण करुन जबरदस्तीने डोमिनिकात नेण्यात आल्याचा दावा वकिलांनी केला आहे. तसेच मेहुल चोक्सी याचा छळ करण्यात आला आहे. त्यांच्या शरीरावर जखमा असल्याचेही म्हटले आहे.


दरम्यान, मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार 500 कोटींचा गंडा घातला आहे. नीरव मोदी सध्या लंडनमधील जेलमध्ये आहे. भारतात प्रत्यार्पण होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान मेहुल चोक्सीने जानेवारी 2018 मध्ये भारतातून पळ काढण्याआधी 2017 मध्ये अँटिग्वा आणि बारबुडा देशांचं नागरिकत्व घेतले होते.