Pakistani Girl Trolled: सोशल मीडियावर 'मेरा दिल ये पुकारे...' या बॉलिवूड गाण्यावर डान्स करून पाकिस्तानी गर्ल खुपच चर्चेत आली होती. तिच्या या रिल्स व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. या गाण्यामुळे ती एकाच रात्री स्टार बनली होती. मात्र याच स्टार गर्लला आता सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. त्यामुळे नेमकं काय कारण आहे, जेणेकरून तिला ट्रोल केले जात आहे, हे जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पाकिस्तानी गर्ल' आयशा सोशल मीडिया स्टार बनली आहे. आयशाच्या 'मेरा दिल ये पुकारे...' या गाण्यावरील डान्स व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवून दिली होती. या रील व्हिडिओमधील आयशाच्या डान्स मूव्ह आणि किलर एक्सप्रेशनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या व्हिडिओमुळे ती रातोरात स्टार बनली होती. मात्र आता तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.


कशी व्हायरल झाली? 


पाकिस्तानच्या लाहोरची रहिवासी असलेल्या आयशाचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल झाला होता.या व्हिडिओत 18 वर्षीय आयशाने लग्नाच्या कार्यक्रमात लता मंगेशकर यांच्या "मेरा दिल ये पुकारे" या क्लासिक गाण्यावर नृत्य केले होते. या तिच्या व्हिडिओवर तिला भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. या एका व्हिडिओमुळे आयशाचे सोशल मीडियावर फॅन फॉलोइंगही वाढले होते.


का होतेय ट्रोल? 


आयशाच्या या व्हिडिओमुळे तिची फॅन फॉलोविंग जबरदस्त वाढली आहे. या व्हिडिओनंतर आयशाने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर काही फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये आयशा पाश्चिमात्य कपडे घालून कॅमेरात मिडल फिंगर दाखवून ट्रोलर्सना प्रत्युत्तर देताना दिसली होती. मात्र या फोटोवरून आता फॅन्सच चांगलेच वैतागले आणि तिला ट्रोल करतायत. 



चाहत्यांच्या प्रतिक्रिया


आयशाच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करून तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका यूझरने लिहिले की, थोडीशी प्रसिद्धी काय मिळाली खरी परिस्थिती दाखवायला लागली. तर दुसऱ्या यूझरने लिहिले की, रानु मंडलची आठवण आली. तर तिसऱ्या युझरने तिला अहंकारी म्हटले आहे.


दरम्यान आय़शा जितक्या वेगाने सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली होती, तितक्याच वेगाने आता ट्रोल देखील होते आहे.