1 कोटीच्या Mercedesमध्ये स्टंटबाजी नडली, धुर निघाला आणि... पाहा VIDEO
OMG! 1 कोटीच्या गाडीतून स्टंट करण्याची धाडसं बेतलं जीवावर, नेमकं काय घडलं पाहा VIDEO
मुंबई: जीव धोक्यात घालून अनेकदा स्टंट केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावरून समोर येत असतात. कधी कारच्या दरवाज्यातून तर कधी दुचाकीवर स्टंटबाजी सुरू असते. अशीच कारमध्ये स्टंटबाजी करणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. 25 वर्षीय व्यक्ती आपल्या लग्झरी 1 कोटीच्या कारमध्ये बसून स्टंट करत होता. त्याच दरम्यान मोठी दुर्घटना घडली. दैव बलवत्तर म्हणून त्याचा जीव थोडक्यात वाचला आहे.
25 वर्षीय व्यक्ती आपल्या महागड्या Mercedes कारमधून नागरिकांसमोर स्टंट करत होता. त्याच दरम्यान त्याच्या कारमधून धूर निघाला आणि अचानक आग लागली. या घटनेमुळे उपस्थित नागरिकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.
एक 25 वर्षीय ऑस्ट्रेलियन तरुणाचा मर्सिडिज कारमध्ये स्टंट सुरू असताना आग लागली.ही आग लागल्यानंतर तरुण जीव वाचवण्यासाठी धडपडत होता. या घटनेमुळे कारमध्ये असलेले दोन जण घाबरले. त्यांनी तिथून जीव मुठीत धरून पळ काढला.
दैव बलवत्तर होतं म्हणून यामध्ये कोणतीही दुर्घटना झाली नाही. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या लग्झरी मर्सिडिज कारची किंमत साधारण 1.2 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. ओव्हरहिट झाल्यामुळे कारमध्ये आग लागली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच तिथे आपत्कालीन विभागाचे कर्मचारी पोहोचले. त्यांनी या आगीवर तातडीनं नियंत्रण मिळवलं आहे. याची माहिती पोलिसांनी फेसबुक पोस्टद्वारे देखील दिली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा ऑस्ट्रेलिय़ामधला आहे. असे स्टंट जीवघेणे ठरू शकतात त्यामुळे ते न करण्याचं आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आलं आहे.