नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाने (आय एस् एस ) घेतलेल्या फोंटोमध्ये काही संशयास्पद  वस्तू आढळल्या आहेत. यामुळं गूढ निर्माण झालं आहे.


आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाचं निरीक्षण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाने (आय एस एस ) घेतलेल्या  फोंटोमध्ये आणि व्हिडिओमध्ये अग्निगोलसदृश्य वस्तू दिसल्या आहेत.
यावरून मोठी खळबळ उडाली असून, उडत्या तबकड्यांच्या अस्तित्वाच्या चर्चांना उधाण आलं आहे.


परग्रहावरची जीवसृष्टी


उडत्या तबकड्यांच्या समर्थकांनी ते अग्निगोल म्हणजे उडत्या तबकड्या किंवा परग्रहावरचं यान असल्याचा दावा केला आहे.
परग्रहवासिय आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला भेट देण्यासाठी आल्याचं त्याचं म्हणणं आहे.


अवकाश संशोधकांचं मत


अवकाश संशोधकांनी मात्र या शक्यतेचं खंडन केलं आहे. हे उडत्या तबकड्या किंवा परग्रहावरचं यान नसून अवकाशातून प्नवास करणाऱ्या अशनी किंवा उल्का असल्याचं म्हटलं आहे.


नेहमीच वादग्रस्त असलेला उडत्या तबकड्या किंवा परग्रहावरचं यानाचा विषय या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.