मुंबई : आजपासून सौदी अरेबियात महिलांना वाहन चालवण्याची परवानगी मिळाली आहे. सौदी अरेबीयात १० महिलांना वाहन चालवण्याचा परवाना देण्यात आला आहे.  राजकुमार मोहम्मद बिन सलमान सौदी अरेबीयामध्ये आमुलाग्र बदल करत आहेत. या बदलाचाच एक भाग म्हणून महिलांना वाहन चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी सौदी अरेबियात महिलांना वाहन चालवायला बंदी होती. 28 वर्षांनंतर महिलांना वाहन चालवण्यास परवानगी मिळाली आहे. 


ट्रक, मोटारसायकल देखील चालवू शकतात 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला फक्त कारच नाही तर कार, ट्रक आणि मोटारसायकल देखील आता चालवू शकतात. मात्र खाजगी वाहन चालवण्यासाठी 18 वर्षाची वयोमर्यादा महत्वाची असणार आहे. आणि सार्वजनिक वाहन चालवण्यासाठी 20 वर्ष वय असणं गरजेचं आहे. 


28 वर्षाचा संघर्ष 


47 महिलांनी 1990 साली नियम तोडून शहरात वाहन चालवले होते. तेव्हा त्या सगळ्या महिलांना अटक करण्यात आळी होती. त्यावेळी सर्वोच्च धार्मिक संस्थांनी आदेश देऊन महिलांवर गाडी चालवण्यासाठी बंदी घातली होती.