2047 मधून 2023 मध्ये आला व्यक्ती? टाईम मशिन कल्पना की सत्य?
टाईम मशिन कल्पना की सत्य? 2047 मधून 2023 मध्ये आला व्यक्ती? कसा आहे टाईम मशिनने आलेला भविष्य मानव? युट्यूब व्हिडिओद्वारे मोठा दावा.
Time Traveler : टाईम मशिन कल्पना की सत्य? या प्रश्नाचे ठोस उत्तर मिळालेले नाही. आपण सगळ्यांनीच सिनेमांमध्ये टाईम मशिन नक्की पाहिली असेल किंवा पुस्तकांमध्ये त्याबद्दल ऐकलं असेल. ज्याद्वारे भविष्यात जाता येतं. यावर वैज्ञानिकही काम करतायत मात्र याचा कोणता ठोस पुरावा आजवर मिळालेला नाही. मात्र नुकताच एका व्यक्तीनं दावा केलाय की तो आपल्या वयाच्या 20 वर्ष मागे जाऊन आलाय.
यूटयूबवर व्हिडीओ शेअर करत दावा सिद्ध करण्याचा प्रयत्न
एका रिपोर्टनुसार एका व्यक्तीनं यूटयूबवर व्हिडीओ शेअर करत आपला दावा सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा व्हिडीओ पाहून लोकांची झोप उडाली आहे. पण कसं कुणी वेळेच्या मागे जाऊ शकतं. व्हिडीओत दोन लोकं दिसतायंत ज्यांचे चेहरे ब्लर आहेत मात्र त्यांच्या हातावर मॅचिंग टॅटू आहेत. व्यक्तीचं नाव आहे माईक विलियम्स (time traveler mike williams) असून 2047 मध्ये जाऊन आल्याचा दावा तो करतोय. इनोव्हेटीव्ह टेक्नोलॉजी या व्हर्चुअल रिऍलिटी कंपनीसाठी तो काम करतोय, ही कंपनी 2025 मध्ये प्रसिद्धीला येणार आहे.
माईकचा दावा
इनोव्हेटीव्ह टेक्नोलॉजी या व्हर्चुअल रिऍलिटी कंपनीसाठी माईकनं टाईम मशिन बनवली आहे. कंपनीनं ही मशीन पाहून त्याला शेअर होल्डरही बनवल आहे. मात्र, कंपनीनं धोका दिला ज्यामुळे माईकनं आपली टाईम मशीन ऍक्टीव्हेट केली. ही मशिन ऍक्टीव्हेट केल्यानंतर एक म्हातारा व्यक्ती माईकला भेटायला आला आणि त्यानं आपण 2047 मधून आल्याचं सांगितले. त्याच्या हातावर एक टॅटू होता जो माईकनं त्याच्या लहानपणी बनवला होता. ही दोन्ही माणसं एकच व्यक्ती आहेत. एक वर्तमानातली आणि एक भविष्यातील.
2042 मध्ये त्याला कंपनीनं काढून टाकलं आणि म्हणून माईक भूतकाळात परत आला. आता हे दोन्ही माईक मिळून टाईम मशिन बनवत असल्याचा दावा करण्यात आला आहे. अर्थात या दाव्यांची सत्यता अजून तपासण्यात आलेली नाही. झी २४ तास यापैकी कोणत्याही दाव्याची पुष्टी करत नाही.