Military Training To Children In China : भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये सुरु असणारा संघर्ष नवा नाही. चीनच्या खुरापतींना आजवर भारतानं सातत्यानं सडेतोड उत्तर दिलं आहे. पण, सध्या मात्र चीनमध्ये जे काही सुरु आहे ते पाहता यावर कोणालाच नियंत्रण मिळवणं शक्य नाही. किंबहुना आता चीनच्या कावेबाजपणाची दखल जागतिक स्तरावर घेतली जाणं महत्त्वाचं ठरत आहे. 


चीनमध्ये काय घडतंय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आता पुन्हा एकदा त्यांच्या निर्णयांमुळं चर्चेत आले आहे. यावेळी चीनमध्ये मोठ्या संख्येनं युवा वर्गाला लष्करी प्रशिक्षण दिलं जात असल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. प्राथमिक माहिती आणि माध्यमांनी वर्तवलेल्या अंदाजनुसार इथं युवा वर्गाला युद्धाभ्यासाचंही प्रशिक्षण दिलं जात आहे. 


सध्या चीनमध्ये सात वर्षांहून कमी वयाच्या मुलांसाठी अॅथलॅटीक्सच्या नावाखाली लष्करी प्रशिक्षणवर्गांचं आयोजन केलं जात आहे. शांघाई शहरामध्ये या प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं असून, इथं साधारण 932 अॅशलिट्सचा सहभाग असल्याचं वास्तव समोर आलं आहे. 


सात दिवसांसाठी चालणाऱ्या या शिबिरामध्ये चीनमधीय या मुलांना आणि लहानग्यांना लहानमोठ्या गोष्टीचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये मुलांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या काही उपक्रमांचाही समावेश आहे. 


प्रत्येक परिस्थितीसाठी सक्षम असावं... 


काही दिवसांपूर्वीच चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी असणाऱ्या जिनपिंग यांनी आपण खऱ्या अर्थानं कोणत्याही परिस्थितीसाठी तयार / सक्षम असणं गरजेचं असल्याचं वक्तव्य केलं होतं. युद्धजन्य परिस्थिती आणि तत्सम गोष्टींना अनुसरूनच त्यांनी हे वक्तव्य केल्याचं म्हटलं गेलं. शांघाई स्पोर्ट्स ब्युरोच्या माहितीनुसार या अॅथलीट्सना चीनच्या लष्करातील युद्धभावनेचा अभ्यास करण्यासाठी हे प्रशिक्षण दिलं जात आहे. 


हेसुद्धा पाहा : नेटवर्क नसतानाही 'या' स्मार्टफोननं करता येणार Call; पाहा अफलातून डिझाईन आणि फिचर्स 


जागतिक स्तरावर सुरु असणाऱ्या चर्चा मात्र वेगळ्याच दिशेनं खुणावत आहेत. लहान मुलं आणि तरुण पिढीला शिस्त, संकटाच्या वेळी सक्षम असण्याची गरज या आणि अशाच परिस्थितीच्या दृष्टीनं या प्रशिक्षणात तयार केलं जात आहे. शिवाय जास्तीत जास्त वेळेसाठी सक्षम राहण्यासोबतच आव्हानात्मक परिस्थितीमध्ये धाडसानं निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करण्यासाठीचं प्रशिक्षण या मुलांना देण्यात येणार आहे. 


चीनमध्ये सुरु असणाऱ्या या प्रशिक्षण शिबिरासाठी 7 ते 25 वयोगटातील लहान मुलं आणि युवांचा समावेश आहे. सर्व वयोगटातील मुलांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणामागचा हेतू एकसमान असून, यामध्ये त्यांनी वेळापत्रक, शिस्तबद्धपणाचं पालन करणं बंधनकारक आहे.