मुंबई : जगात असे अनेक दुर्मिळ प्राणी आहेत ज्यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असते. आता असा एक जीव सापडला आहे, ज्याबद्दल जाणून तुम्ही थक्क व्हाल. या प्राण्याला 1306 पाय आहेत आणि तो जमिनीच्या आत खूप खोलवर राहतो. ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी जगातील अशा पहिल्या मिलिपीड्सचा शोध लावला आहे, जो अत्यंत दुर्मिळ आहे. चला जाणून घेऊया या अनोख्या प्राण्याबद्दल...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की पहिले मिलिपीड्स 400 दशलक्ष वर्षांपूर्वी सापडले होते. मात्र ते मिलिपीड हजारो पाय असलेले नव्हते. शास्त्रज्ञ म्हणतात की, नुकतेच नवीन मिलिपीड सापडले आहे. आत्तापर्यंत 100-पायांचे मिलिपीड्स सापडले आहेत. सध्या एल्कमे प्लेनीपचा विक्रम 750 पयांचा होता आणि हा प्राणी जमिनीच्या खूप खोलवर सापडतो. या अनोख्या प्राण्याबद्दल शास्त्रज्ञांनी अनेक आश्चर्यकारक गोष्टी सांगितल्या आहेत.



सर्वात जास्त पायांचा प्राणी युमिलेप्स पर्सेफोन होय. हा फिकट पिवळ्या रंगाचा असतो.  आश्चर्याची गोष्ट म्हणजे लांब धाग्यासारख्या दिसणाऱ्या या प्राण्याला डोळे नाहीत. या प्राण्याची रुंदीपेक्षा लांबी 100 पट अधिक असते. या प्राण्याचे डोके आइस्क्रीम शंकूसारखे आहे ज्यावर अनेक अँटेना आहेत. या अँटेना अंधारात फिरण्यास मदत करतात. हा प्राणी बुरशी खातो.


शास्त्रज्ञांनी या प्राण्याचे नाव Eumillipes Persephone असे ठेवले आहे. ऑस्ट्रेलियातील खनिज समृद्ध भागात हा प्राणी सापडला. येथे सातत्याने खाणकाम सुरू असून खाणकाम करताना शास्त्रज्ञांना दोन मादी आणि दोन नर मिलिपीड सापडले आहेत. मादी मिलिपीड्सना 1306 पाय असतात आणि नर मिलीपीड्सना 998 ते 1000 पाय असतात. शास्त्रज्ञांनी सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने या जीवावर संशोधन करून त्याचे चित्र दाखवले आहे..



शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की प्राण्याचे पाय मोजणे सोपे नव्हते. कारण हा प्राणी राउंडवॉर्मप्रमाणे स्वतःला गुंडाळतो. मिलिपीड्सचे आयुष्य सामान्यतः 2 वर्षांचे असते, परंतु युमिलिप्स पर्सेफोनच्या शरीरात असलेल्या रिंग्सवरून असे सूचित होते की ते 5 ते 10 वर्षे जगू शकतात. हे प्राणी जमिनीच्या 200 फूट खाली राहतात, त्यांचा पृष्ठभाग पाहणे फार कठीण आहे.