Dead Child Alive Doctor Treatment: पृथ्वीतलावर आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू हा निश्चित आहे. मृत्यू कधी कसा होईल? कोणी सांगू शकत नाही. असं असलं तरी डॉक्टरांना देवाचा दर्जा देण्यात आला आहे. पण कधी कधी डॉक्टरही रुग्णाला (Patient) वाचवताना हतबल होऊन जातात. सर्वकाही देवाच्या हातात असं सांगून नातेवाईक मनाची समजूत घालतात. अशा प्रसंग आपण चित्रपटात पाहतो आणि अनेक चमत्कार पाहतो. मृत्यूचा दाढेतून रुग्ण परत येतो. असाच काहीसा चमत्कार (Miracle) प्रत्यक्षात ब्रिटनमध्ये घडला आहे. ब्रिटनमधील (Briten) एका डॉक्टराने आपल्या रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून खेचून आणलं आहे. ही घटना एका महिलेच्या प्रीमॅच्योर डिलिव्हरी दरम्यान घडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलेला प्रसुती वेदना होत असल्याने 10 आठवड्यांपूर्वी रुग्णालयात दाखल केलं. यावेळी कॉम्प्लिकेशन पाहता डॉक्टरांनी सिझेरियन करण्याचा निर्णय घेतला. पण मुलाचा जन्म होताच त्याने श्वास घेणं बंद केलं होतं. जवळपास बाळ 17 मिनिटांपर्यंत अशा स्थितीत होतं. या दरम्यान डॉक्टर बाळाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. बाळ श्वास घेत नसल्याचं सांगताच नातेवाईकांच्या पायाखालची वाळू सरकली. पण डॉक्टरांनी शेवटपर्यंत हार मानली नाही. अचानक बाळ रडू लागलं आणि सर्वांच्या जीवात जीव आला. त्यानंतर तीन महिने बाळावर रुग्णालयात उपचार करण्यात आले.


Video: काही सेकंदात अजगरानं शिकार केली फस्त! व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल


डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळेच हा चमत्कार घडला. दहा आठवड्यांआधी जन्म झाल्याने मुलाची तब्येत नाजूक होती. यासाठी मुलाला रक्त देण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी मुलाला ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्याचा सल्ला दिला. दरम्यान मुलाच्या मेंदुवर या कोणताही परिणाम न झाल्याने जीव वाचण्याचा आशा वाढल्या आणि तेच झालं.