आश्चर्य! 24 दिवस न खाता पिता झोपून राहिला तरीही होता जिवंत, कसं ते जाणून घ्या
Viral News of Hibernation: कोणत्याही व्यक्तीला जिवंत राहण्यासाठी खाणं-पिणं महत्त्वाचं आहे. जेवणातून आपल्या शरिराला जीवनसत्त्व, प्रथिनं मिळतात. यामुळे शरीराला उर्जा मिळते. तुम्हाला एखाद्या दिवशी खायला मिळालं नाही तर बेचैन व्हाल. एक दिवसाचा उपवास देखील आपल्याला जड जातो. पण तुम्ही काही दिवस न खाता पिता राहू शकता का?
Viral News of Hibernation: कोणत्याही व्यक्तीला जिवंत राहण्यासाठी खाणं-पिणं महत्त्वाचं आहे. जेवणातून आपल्या शरिराला जीवनसत्त्व, प्रथिनं मिळतात. यामुळे शरीराला उर्जा मिळते. तुम्हाला एखाद्या दिवशी खायला मिळालं नाही तर बेचैन व्हाल. एक दिवसाचा उपवास देखील आपल्याला जड जातो. पण तुम्ही काही दिवस न खाता पिता राहू शकता का? काही जण उपवासाच्या वेळी फळोपहार वगैरे करतात. पण एक व्यक्ती 24 दिवस न खाता पिता झोपून राहिला. तरीही ती व्यक्ती जिवंत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. जापानमधील राहणाऱ्या व्यक्तीनं अशक्यप्राय गोष्ट केली आहे. 2006 मध्ये जापानमधील 35 वर्षीय व्यक्तीसोबत अशी घटना घडली की, विज्ञानावर विश्वास असलेल्या लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मित्सुताका उचिकोशी असं त्याचं नाव आहे.
मित्सुताका उचिकोशीने रोको पर्वताच्या प्रवासातून पायी परतायचे ठरवले. मात्र प्रवासात त्यांची वाट चुकली आणि नदीजवळ पाय घसरल्याने त्याच्या नितंबाचे हाड तुटले. तरीही हार न मानता त्यांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. काही दिवसानंतर त्यांना गाढ झोप आली आणि एका मैदानात आडवे झाले. एका गिर्यारोहकाने त्यांना पाहिलं तेव्हा सदर व्यक्ती मृतावस्थेत दिसत होती. पण त्याच्या हृदयाचे ठोके चालूच होते. शरीराचे तापमान 22 डिग्री सेल्सिअसपर्यंत घसरल्याने शरीराच्या अनेक अवयवांनी काम करणे बंद केले होते. अशा स्थितीत मित्सुताका जिवंत असल्याचं पाहून डॉक्टरही अचंबित झाले. जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा ते एका रुग्णालयात होते. तेव्हा त्यांना कळलं की 24 दिवसानंतर जाग आली आहे.
Love Story: कोट्यधीश तरुणी पडली ड्रायव्हरच्या प्रेमात, गियर बदलताना...
तज्ज्ञांच्या मते, व्यक्तीचा प्राण 24 दिवसापर्यंत कार्यरत होता. व्यक्तीचं शरीर सुप्तावस्थेत गेले होते. त्यामुळे खूप कमी ऊर्जा वापरली गेली आणि तो खाल्ल्या-पिल्याशिवाय 24 दिवस जिवंत राहिला. दोन महिन्यांच्या उपचारानंतर आता ते ठणठणीत आहेत.