मिस आफ्रिका २०१८ फायनलमध्ये विजेत्या सौंदर्यवतीच्या केसांना लागली आग
विजेत्या सौंदर्यवतीच्या केसांना आग
नायजेरिया : मिस आफ्रिका २०१८ या सौंदर्य स्पर्धेच्या अंतिम सोहळ्यात विजेत्या सौंदर्यवतीच्या केसांना आग लागली. नायजेरिया येथे मिस आफ्रिका २०१८ ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत डॉरकस कँसिंडे हिने सौंदर्यवतीचा किताब पटकावला. तिच्या नावाची घोषणा झाल्यानंतर स्टेजवर मोठी आतषबाजी करण्यात आली. यावेळी स्टेजवर उभ्या असलेल्या डॉरकसच्या केसांनाही आग लागली. मुकूट परिधान करण्याच्या समारंभावेळी हा प्रकार घडला. सारं काही अगदी अनपेक्षितपणे आणि अवघ्या काही सेकंदात घडलं. मात्र स्टेजवर असणाऱ्या आयोजकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे डॉरकसच्या केसाला लागलेली आग विझवल्याने ती थोडक्यात बचावली.
पाहा व्हिडिओ