नवी दिल्ली : नव्या आठवड्याची सुरुवात ही भारतीयांसाठी अतिशय आनंददायी ठरली आहे. त्यामागचं कारणंही तसंच आहे. भारताचं मिस युनिवर्स या स्पर्धेत प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या हरनाझ कौर संधू (Harnaaz Kaur Sandhu) हिनं या स्पर्धेत अग्रस्थान कमावत हा किताब आपल्या नावे केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जवळपास 21 वर्षांनंतर हरनाझमुळं या सौंदर्यस्पर्धेत भारताला विजेतेपद मिळालं आहे. 


2000 मध्ये लारा दत्ता हिला या किताबानं गौरवण्यात आल होतं. हरनाझच्या नावाची घोषणा तिथं विजेती म्हणून झाली आणि इथं भारतामध्ये तिची एक झलक पाहण्यासाठी सर्वांनी सोशल मीडियाचा आधार घेतला. 


हरनाझचे फोटो पाहताना, तुम हुस्न परी तुम जाने जहाँ... अशीच प्रतिक्रिया अनेकांनी दिली. (miss universe 2021 )


फिटनेस आणि योगामध्ये स्वारस्य असणारी 21 वर्षीय हरनाझ हिनं फार कमी वयापासूनच या क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. 


2017 मध्ये तिनं मिस चंदीगढ हा किताब जिंकला होता. यानंतर मिस मॅक्स इमर्जिंग स्टार इंडिया 2018 नंही तिला गौरवण्यात आलं होतं. 


विविध सौंदर्यस्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या हरनाझनं कायमच अव्वल स्थान पटकावत सर्वांच्याच मनाचा ठाव घेतला. 




दरम्यान, मिस युनिवर्स होण्यासाठी हरनाझला जवळपास 75 देशांतील सौंदर्यवतींची स्पर्धा होती. यामध्ये मिस स्वीडन, मिस थायलंड, मिस यूक्रेन, मिस यूएसए, मिस वेनेज्युएला, मिस कँमरून, मिस ब्राझील, मिस ब्रिटिश वर्जिन आयलंड यांचा समावेश होता. 




स्पर्धेतील नॅशनल कॉस्च्युम सेशनमध्ये तिनं गुलाबी रंगाचा लेहंगा घातला होता. यासोबतच ती हातात एक मोठी छत्रीही घेऊन दिसली. भारतीय महाराण्यांच्या पेहरावाला ती यावेळी सादर करताना दिसली. 




मुख्य म्हणजे हरनाझच्या वाट्याला यापूर्वीच चित्रपटांच्या ऑफर आल्या आहेत. पुढील वर्षी प्रदर्शित होणाऱ्या 'Bai Ji Kuttange' आणि 'Yaara Diyan Poo Baran' या चित्रपटांमधून ती झळकणार आहे.