मुंबई : इंडोनेशियाची बेपत्ता झालेली पाणबुडी सापडली आहे. बाली बेटाजवळ समुद्राच्या खोल पाण्यात ती सापडली. पाणबुडी ज्या स्थितीत दिसून येत आहे त्यानुसार त्यातील 53 जवानांच्या वाचण्याची शक्यता फारच कमी आहे. इंडोनेशियाच्या नौदलाने पाणबुडी मिळाल्याची माहिती दिली. अध्यक्ष जोको विडोडो यांनी नौदलाच्या सुरक्षित परतीसाठी देशवासियांना प्रार्थना करण्यास सांगितले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडोनेशियाचे लष्कर प्रमुख हादी जाहजांतो म्हणाले की, केआरआय नांगला 402 समुद्रात जेथे बेपत्ता झाली होती. तेथेच वर तंरगत असलेल्या तेलाच्या ठिकाणी त्याचा शोध घेण्यात आला. पाणबुडीचा ढिगारा समुद्राच्या खोल पाण्यात सापडला आहे. पाणबुडीचे अवशेष समुद्र सपाटीपासून सुमारे 500 मीटर खाली सापडले आहेत तर पाणबुडीची जास्तीत जास्त 200 मीटर खोलीपर्यंत जाण्याची क्षमता होती.


पाण्याच्या दाबामुळे पाण्याखाली पाणबुडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पुरावे सापडले आहेत. परिणामी, तेथे उपस्थित असलेल्या 53 नौदलाच्या जवानांपैकी कुणाच्याही जिवंत होण्याची शक्यता फारच कमी आहे. बुधवारी सकाळी सराव दरम्यान पाणबुडी बेपत्ता झाली. इंडोनेशियन नौदलाचे प्रमुख यूदो मारगोनो यांनी बाली येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, पाणबुडी फुटली असेल तर त्याचे तुकडे तुकडे झाले असेल. तसेच, स्फोटाचा आवाज ही नोंदविला गेला असेल.


पाणबुडी बुडण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आपल्या सुरुवातीच्या विधानात नौदलाने भीती दर्शविली होती की पाणबुडीची यंत्रणा विस्कळीत झाली आहे, ज्यामुळे ते पाण्याखालून वर येण्यास यशस्वी होऊ शकले नाही. दुर्घटना होण्यापूर्वी आपत्कालीन परिस्थितीत कोणती पावले उचलली जावीत यासाठी पाणबुडीमध्ये असलेल्या जवानांना वेळ मिळाला नसेल. इंडोनेशिया आणि इतर अनेक देशांचे बचाव दल पाणबुडीच्या शोधात होते.


शनिवारी सकाळपर्यंत पाणबुडीत ऑक्सिजन पुरवठा होत होता. त्यामुळे सैनिकांना जिवंत समजून त्यांचा शोध घेतला जात होता. शनिवारी अमेरिकेचे पी-8 पोझेडॉन विमानही शोध आणि बचाव कार्यात सामील झाले. या मोहिमेमध्ये 20 इंडोनेशियन जहाज, सोनार सुविधेसह ऑस्ट्रेलियन युद्धनौका आणि चार इंडोनेशियन विमानांचा समावेश आहे. या मोहिमेमध्ये शनिवारी रात्री सिंगापूरची जहाजे आणि रविवारी मलेशियातील जहाजांचा समावेश आहे. या मोहिमेमध्ये भारताचे जहाजही सहभागी होते.