स्विस बॅंकेत भारतीयांच्या ठेवींत आश्चर्यकारक वाढ, चार वर्षांत पहिल्यांदा मोठी वाढ
भारतातील काही लोकांनी आपला मोर्चा पुन्हा स्विस बॅंकेकडे वळवलाय. चार वर्षांत पहिल्यांदाच विक्रमी पैसे जमा केलेत.
ज्युरिख : भारतातील काही लोकांनी आपला मोर्चा पुन्हा स्विस बॅंकेकडे वळवलाय. चार वर्षांत पहिल्यांदाच पैसे जमा केलेत. हा आकडा ऐकला तर तुम्हाला चक्कर येईल, एवढा रग्गड पैसा जमा केलाय. गेल्या चार वर्षांचा विचार करता एक अरब स्विस फॅंक (७,००० कोटी रुपये) जमा करण्यात आले आहेत. जर गतवर्षीची तुलना केली तर ५० टक्क्यांनी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. स्विझर्लंडची केंद्रीय बॅंकेच्या ताज्या अहवालामध्ये हे आकडे पुढे आलेत. म्हणजेच भारतीयांनी स्विस बॅंक खात्यात जमा केलेला पैसा २०१७मध्ये ५० टक्क्यांनी वाढून ७००० कोटी रुपये (१.०१ अरब फ्रॅंक) झाले आहेत.
याआधी पहिल्या तीन वर्षांत बॅंकेत भारतीयांनी पैसे जमा केले नव्हते तर काढून घेतले होते. ही स्विस बॅंक खूपच गुप्तता बाळगते. मात्र, भारतीयांनी जमा केलेल्या (काळ्या) पैशांविरोधात भारत सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली. स्विस नॅशनल बॅंकेचे (एसएनबी) वर्षाचे आकडे पाहिले तर स्विस बॅंक खात्यात भारतीयांनी २०१६मध्ये ४५ टक्के घट होऊन ६७,६ कोटी फ्रॅंक (जवळपास ४५०० कोटी रुपये) राहिलेत. ही संपत्ती १९८७ च्या आकड्यांपेक्षा सर्वात कमी होती.
एसएनबीच्या आकडेवारीनुसार, भारतीयांनी स्विस बँकेत २०१७मध्ये जवळपास ६८९१ कोटी रुपये (९९.९ दशलक्ष फ्रॅंक) बनली. त्याच काळात प्रतिनिधींनी ठेवलेल्या पैशांचा किंवा संपत्ती व्यवस्थापकांना या कालावधीत ११२ कोटी रुपयांचा (१.६२ कोटी फ्रॅंक) हिस्सा मिळाला होता. ताज्या आकडेवारीनुसार, भारतीयांच्या स्विस बँक खात्यात जमा केलेल्या ३२०० कोटीं रुपये. अन्य बॅंकेच्या माध्यातून १०५० कोटी रुपये आहेत.
एका वर्षात भारतीयांच्या संपत्तीमध्ये वाढ होत गेली आहे. स्विस बँकेतील खात्यांत भारतीयांचे २०११ मध्ये १२ टक्के वाढ, २०१३ मध्ये ४३ टक्के, २०१७ मध्ये ५०.२ टक्के वाढ झालेय. याआधी २००४ मध्ये ५६ टक्के वाढ झाली होती.