Kamil Bartoshek drops 1 million dollars : घरी कधी जास्तीचे पैसे मागितले तर, पैशांचं झाड लागलंय का? की पैशांचा पाऊस पडलाय? असं नेहमी तुम्हीही ऐकायला मिळत असेल. तुम्हीही कधी पैशांचा पाऊस (Money rain) पडताना पाहिलं नसेल. मात्र, आता पहिल्यांदा एका देशात पैशांचा पाऊस पडल्याचं चित्र समोर आलं आहे. चेक रिपब्लिकच्या (Czech Republic) मधून असा एक व्हिडीओ समोर आलाय, तो पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झेक प्रजासत्ताकमधील इन्फ्लुएन्सर कामिल बार्टोशेक (Kamil Bartoshek) यांनी हेलिकॉप्टरमधून 1 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची हॅलिकॉप्टरमधून उधळण केल्याचं समोर आलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. नेमकं काय झालं पाहुया...


झालं असं की.. झेक प्रजासत्ताकमधील इन्फ्लुएन्सर कामिल बार्टोशेक यांनी एक स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील विजेत्याला एक मिलियन डॉलर पैसे देण्यात येणार होते. मात्र, कोणीही स्पर्धा जिंकू शकले नाही. त्यामुळे कामिल बार्टोशेक यांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी प्रत्येक स्पर्धकामध्ये पैसे वितरित करण्याचा निर्णय घेतला. यानंतर, त्याने सर्व स्पर्धकांना ईमेलद्वारे एक गुप्त संदेश पाठवला.


ईमेलद्वारे त्यांनी सर्वांना एकत्र बोलवलं. त्यातही एक कोडं देण्यात आलं होतं. एका कोडचा अर्थ लावून लोकांना त्याठिकाणी पोहोचायचं होतं. सर्व लोक सांगितलेल्या जागेवर पोहोचल्यावर त्यांनी हॅलिकॅप्टरच्या माध्यमातून पैशांचा वर्षाव केला. पैसे उधळले गेल्याचं पाहून स्पर्धकांनी धाव घेतली अन् आपल्या बॅगा भरून घेतल्या. याचा व्हिडीओ कामिल बार्टोशेक यांनी शेअर केलाय.  


पाहा Video



दरम्यान, जगातील पहिला वास्तविक पैसा पाऊस! $1.000.000 चेक रिपब्लिकमध्ये हेलिकॉप्टरमधून पडले आणि कोणीही मरण पावलं नाही किंवा जखमी झालं नाही, असं कामिल बार्टोशेक यांनी म्हटलं आहे.