उलानबटोर : मंगोलियाच्या नॅशनल सेंटर फॉर झूनोटिक डिसीजेस (NCJZD) ने म्हटले आहे की मंगोलियातील सात बीव्हर्सना (beaver) कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. मंगोलियामधील बीव्हर्सची COVID-19 टेस्ट पॉझिटिव्ह झाली आहे. देशातील एखाद्या प्राण्यामध्ये कोरोनाव्हायरस संक्रमणाची ही पहिलीच घटना आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेल्टा व्हेरिएंटचा कहर


एनसीझेडडीचे संचालक न्यामदोर्ज सोगबद्रख यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले, राजधानी उलानबटोरच्या पर्यावरण विभागातील उलानबटोर (Ulanbatore) ब्रीडिंग केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी ऑगस्टमध्ये कोविड चाचणी घेतली. त्यानंतर, 7 बीव्हर्समध्ये डेल्टा प्रकार सापडला. त्याचवेळी, झिनहुआ या वृत्तसंस्थेलाही मंगोलियन प्राण्यांमध्ये कोविड -19 असल्याची पुष्टी झाली आहे.



चीनमधील मीडिया हाऊस सीजीटीएन (CGTN) मध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, झू अधिकाऱ्यांना संक्रमित बीव्हर्समध्ये खोकला, सर्दी सारखे लक्षणं दिसली, ह सगळे प्राणी सध्या कोरोना निगेटिव्ह झाले आहेत. या कोरोना महामारीचं संक्रमण राजधानी उलानबटोरसह देशाच्या सर्व 21 राज्यांमध्ये वाढत आहे. नव्या डेल्टा व्हेरिएंट अधिक घातक ठरत आहे.


34 लाख लोकसंख्या असलेल्या मंगोलियामध्ये 1,021 लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण 2,52,648 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.