Monkey Reaction After See Hairstyle Of Man: सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात वन्यप्राण्यांच्या व्हिडीओंना नेटकऱ्यांची सर्वाधिक पसंती मिळते. जंगलात राहणारे प्राणी कसे वागतात? काय करतात? याबाबत कुतुहूल असतं. जंगलात राहणारी माकडं (Monkey) माणसांच्या जवळ राहतात. अनेक ठिकाणी माणसांच्या आसपासच माकडांचा वावर असतो. काही माकडं तर माणसाळलेली असतात. त्यामुळे त्यांचे हावभाव पाहण्यासारखे असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक माकड एका व्यक्तीसोबत असल्याचं दिसत आहे. व्यक्तीची हेअरस्टाईल (Hairstyle Reaction) पाहून दिलेली रिअॅक्शन पाहून तुम्हालाही हसू येईल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक व्यक्ती टोपी घालून बसलेला दिसत आहे. तर त्याच्या बाजूला माकड पिवळे कपडे घालून बसलेला आहे. पाळीव माकड असल्याचं व्हिडीओवरून दिसत आहे. माकड त्याला काही विचारण्यासाठी खांद्यावर हात मारताना दिसत आहे. त्यानंतर तो डोक्यावरील टोपी काढतो आणि त्या क्षणीच माकड त्याला पाहते. त्याची विचित्र हेअरस्टाईल पाहून चक्रावून जातो. त्याची रिअॅक्शन पाहून तुम्ही हसाल. 



अवघ्या 4 सेकंदाचा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला आहे. एका युजर्सने लिहिलं आहे की, "माकडाची प्रतिक्रिया पाहून खूपच हसू आलं. माकडाचा क्लोजअप मिळाला असता आणखी मजा आली असती" दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे, 'अरे रे काय ती हेअरस्टाईल...माकड पण घाबरलं.'