ब्युरो रिपोर्ट: अमेरिकेत कोरोना व्हायरसचे ५ हजारांवर बळी गेले आहेत. जगभरात कोरोना बाधितांची संख्या ९ लाख ३६ हजारांवर पोहचली असून बुधवारी दिवसभरात ४८८३ जणांचा बळी गेला. म्हणजे कोरोनानं जगभरात दर मिनिटाला ३ पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडले.


अमेरिकेत कोरोना बळींची संख्या ५ हजारावर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेत एकाच दिवसात १ हजार ४९ जणांचा बळी गेला. अमेरिकेत कोरोना बळींची संख्या आता पाच हजारांवर गेली असून मृतांचा आकडा ५११० इतका झाला आहे. अमेरिकेतली ही जीवितहानी ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यापेक्षा मोठी आहे. एकट्या न्यूयॉर्क शहरात २२१९ जणांचा बळी गेला आहे. अमेरिकेत १ लाख ते २ लाखांपर्यंत लोक कोरोनामुळे दगावतील असा अंदाज व्हाईट हाऊसनं वर्तवला आहे. त्यामुळे अमेरिकेत कोरोनाचं संकट किती भयानक असेल याचा अंदाज येऊ शकतो.


ब्रिटनमध्येही एका दिवसात ५०० हून अधिक बळी


बुधवारी दिवसभरात इटलीत ७२७ तर स्पेनमध्ये ९२३ बळी गेले. ब्रिटनमध्येही कोरोनाचा कहर आणखी वाढत असून एका दिवसात तिथं ५६३ बळी गेले. तर फ्रान्समध्ये दिवसभरात ५०९ लोक दगावले.


 


इटलीमध्ये मृतांचा आकडा १३ हजार १५५ इतका झाला आहे. स्पेनमध्ये बळींची संख्या ९३८७ पर्यंत पोहचली आहे. त्यानंतर अमेरिकेत ५११०, तर फ्रान्समध्येही मृतांचा आकडा ४ हजारावर म्हणजे ४०३२ इतका झाला आहे. चीनमध्ये ३३१२ जणांचा बळी गेलाय. तर ब्रिटनमध्ये २ हजार ३५२ जण मृत्युमुखी पडले आहेत. इराणमध्ये ३ हजार ३६ लोक कोरोनाचे बळी ठरले आहेत.


याशिवाय नेदरलँण्ड, बेल्जियम, स्वीत्झर्लँडमध्येही मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले आहेत. नेदरलँण्डमध्ये ११७३, बेल्जियममध्ये ८२८ तर स्वित्झर्लँडमध्ये ४८८ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.


<p><iframe allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen="" frameborder="0" height="350" src="https://zeenews.india.com/marathi/live/embed" width="560"></iframe></p>


अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या २ लाखांवर गेली आहे. तर इटली आणि स्पेनमध्ये हा आकडा १ लाखावर गेला आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत असून दिवसेदिवस कोरोनाचं संकट आणखीच वाढत आहे.