Whale Died in New Zealand : व्हेल माशाचे सर्वांनाच आकर्षण असते. मात्र, न्यूझीलंड येथील समुद्र किनाऱ्यावर एक विचित्र घटना घडली आहे. गेल्या आठवडाभरात येथे 400 हून अधिक व्हेल माशांचा मृत्यू (Whale Death) झाला आहे. (Pilot whales die) विशेष म्हणजे यातील बहुतांश मासे मारले गेले आहेत. 12 ऑक्टोबर रोजी, न्यूझीलंडच्या पिट बेटावर 240 पायलट व्हेल मृत ( Whale Death News) झाल्याची माहिती पुढे आली आहे. हे व्हेल मासे समुद्राच्या किनाऱ्यावर अडकले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, न्यूझीलंडच्या संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, व्हेल अशा ठिकाणी अडकले होते की तेथे बचावकार्य सुरु होते. त्यांना भीती होती की त्यांनी मासे परत पाण्यात पाठवण्याचा प्रयत्न केला तर या धोकादायक शार्क व्हेल मानवांवर हल्ला करु शकतात. 


अस्वस्थ करणारी घटना


चॅरिटी प्रोजेक्ट जोनाहचे सरव्यवस्थापक डॅरेन ग्रोव्हर यांनी सांगितले की, या भागात त्यांना समुद्र पाण्यात पुन्हा सोडण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी मदत नव्हती. तसेच मदतीसाठी लागणारे पुरेसे लोक नव्हते. दरम्यान, येथील धर्मादाय संस्था व्हेल माशांसाठी काम करते. चथम बेटावर 215 व्हेल आढळल्यानंतर संस्थेने फेसबुकवर स्पष्ट केले की, मोठ्या प्रमाणात मासे पकडणे त्रासदायक आहे. 400 पेक्षा जास्त पायलट व्हेल मरण पावले आहेत, असे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. अडकलेल्या कोणत्याही व्हेलला पुन्हा फ्लोट करता आले नाही आणि सर्व एकतर नैसर्गिकरित्या मरण पावले, असे व्हेल वाचविण्यासाठी आणि मदत करणार्‍या   डॅरेन ग्रोव्हर यांनी सांगितले.


आश्चर्यकारीक घटनांपैकी एक


न्यूझीलंडमधील या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे, कारण व्हेल बीचिंग ही सागरी विज्ञानातील सर्वात रहस्यमय घटना आहे. जे सागरी जीवशास्त्रज्ञ अद्याप समजू शकलेले नाहीत. काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, किनाऱ्याच्या खूप जवळ आल्याने व्हेल मासे अडकतात. ज्यानंतर त्यांना पाण्यात परतणे कठीण होते. 


मोठ्या आकाराचे मासे किनाऱ्यावर कसे अडकतात?


न्यूझीलंडच्या दक्षिण बेटाच्या पूर्व किनार्‍यापासून सुमारे 840 किमी अंतरावर पिट आणि चथम बेटे ही समूहातील सर्वात मोठी बेटे आहेत. या मोठ्या चथम बेटावर सुमारे 800 लोक राहतात आणि पिट बेटावर 40 लोक राहतात. मोठ्या आकाराचे मासे किनाऱ्यावर कसे अडकतात याचा शोध शास्त्रज्ञांना अद्याप सापडलेला नाही. 1918 मध्ये चथम बेटांवर सर्वाधिक मासे पकडले गेले. त्यावेळी या घटनेत 1000 हून अधिक जनावरांचा मृत्यू झाला होता.