World News : हिमालयाच्या पर्वतशिखरांनी कायमच आपल्यालातील लहान मूल जागं केलं आहे. शालेय अभ्यासक्रमांपासून ओळखीत आलेला हा हिमालय पर्वत किंबहुना त्या पर्वतरांगांमध्ये येणारी पर्वतशिखरं कायमच आश्चर्याचा मुद्दा ठरली. पण हीच पर्वतशिखरं आता संपूर्ण जगाची चिंता वाढवताना दिसत आहेत. कारण? कारण वाचून हैराण व्हाल, आपण नेमके किती चुकलो याचा विचारही कराल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Reuters च्या एका अहवालानुसार आशिया खंडात असणाऱ्या जवळपास 75 टक्के हिमालय पर्वतरांगांमधील हिमशिखरं 21 व्या शतकाच्या अखेरपर्यंत पूर्णपणे वितळतील, त्यांचं अस्तित्वं नाहीसं होईल. संशोधकांच्या मते तो काळ इतका भीषण असेल की जागतिक तापमानवाढ, अचान येणारे पूर आणि दुष्काळाचं संकट संपूर्ण जगावर घोंगावेल. पर्वतीय क्षेत्रांमध्ये वास्तव्यास असणाऱ्यांच्या आयुष्यावर याचे थेट परिणाम होतील. (more than 75 percent of himalayan mountain ranges will melt by the end of 21 st century)


पाहा कोणत्या भागावर होणार थेट परिणाम... 


तब्बल 3500 किलोमीटर इतक्या अंतरावर पसरलेल्या हिन्दु कुश हिमालयाची शिखरं भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, चीन, म्यानमार, नेपाळ आणि पाकिस्तान या राष्ट्रांमध्ये पसरली आहेत. त्यापेकी हिमालयाचा पूर्व भाग म्हणजेच नेपाळ आणि भूतान यामुळं सर्वाधिक प्रभावित होईल. 


आंतरराष्ट्रीय स्तरावर एका गटातील शास्त्रज्ञांनी निरीक्षणाच्या माध्यमातून हा धक्कादायक खुलासा केला. त्यांच्या मते हिमालय आणि K2 पर्वतांवरील बर्फ वितळण्याचा वेग प्रचंड वाढला आहे. 2010 च्या तुलनेत मागील दशकात हे पर्वत 65 टक्के वेगानं वितळले. 


हेसुद्धा वाचा : समुद्रातून जोरात आवाज येतोय; Titanic चे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या पाणबुडीबाबत मोठी Update 


2019 मध्ये  Rolex Perpetual Planet Everest Expedition आणि National Geographic च्या निरीक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार 1800 च्या मध्यावरच माऊंट एव्हरेस्टवरील बर्फ वितळण्यास सुरुवात झाली. पण, 1950 ते 2000 च्या नंतर मात्र हा बर्फ वितळण्याचा वेग वाढला. 


गंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढणार (Ganges)


हिमालयासंबंधीच्या या निरीक्षणानुसार गा नदी, सिंधु नदी, मेकॉन्ग नदीसह जवळपास 12 नद्यांचा जलस्तर चिंताजनक वेगानं वाढेल ज्यामुळं नजीकच्या भागात राहणाऱ्या नागरिकांचं आयुष्य प्रभावित होईल. थोडक्यात निसर्गावर होणारे आघात आणि मानवी हस्तक्षेपामुळंच संपूर्ण जगावर ही वेळ येईल आणि काही कळेपर्यंत फार उशीर झालेला असेल.