नवी दिल्ली : मॉरीशस सरकारने भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर सन्मानात मॉरीशस आणि भारतीय राष्ट्र ध्वज अर्ध्या अंतरावर खाली आणला. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगनाथ यांच्या कार्यालयातर्फे याबद्दलची माहिती देण्यात आली. 'अटल बिहारी वाजपेयींच्या निधनानंतर सरकारने असा निर्णय घेतलाय की, मॉरीशस आणि भारतीय ध्वज शुक्रवारी सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत अर्धे झुकलेले फडकतील.' असे निर्देश मॉरीशस पंतप्रधान कार्यालयातून देण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरूवारी दिल्लीत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत निधन झालं. मॉरीशसची साधारण ६८ टक्के लोकसंख्या (१३ लाख) भारतीय वंशाची आहे.


'मॉरीशससाठी उभे राहिले' 



अटलजींनी भारत नितीला आपल्या साहसी नेतृत्व आणि सामान्य माणसाप्रती असलेल्या सहानभूतीने आकार दिल्याचे जगनाथ यांनी म्हटले. आज जागतिक स्तरावर भारत प्रगती आणि विकास केंद्र म्हणून ओळखला जातो, आम्ही वाजपेयी यांचे मजबूत आणि सक्षम नेतृत्व विसरू शकत नाही असेही ते म्हणाले.


मॉरीशस अशा व्यक्तीसाठी दु:ख व्यक्त करतोय जो केवळ भारतासाठीच नाही तर मॉरीशससाठीदेखील उभे राहिले, अशा शब्दात त्यांनी आदरांजली वाहिली. इथे नवी दिल्लीतील ब्रिटीश दूतावासात ब्रिटीश झेंडा यूनियन जॅकलाही अर्ध्यापर्यंत आणले गेले. ब्रिटीश उच्चायुक्तांनी अटलजींच्या सन्मानासाठी ब्रिटीश झेंडा अर्ध्यावर आणल्याचेही सांगितले जात आहे.