Most Expensive Bull Semen: पशू व्यवसायामध्ये प्रजननासाठी किंवा शर्यतीसाठी वापरल्या जाणाऱ्या बैलांची किंमत फार जास्त असते. ऑस्ट्रेलियामधील अशाच एका महागड्या बैलाने अनोखा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. येथील एका बैलाचं वीर्य तब्बल 20 लाखांना विकलं गेलं आहे. अनेक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या बैलाच्या वीर्यासाठी सर्वात जास्त बोली लावण्यात आली आहे. बैलाच्या वीर्याला मिळालेली ही सर्वाधिक किंमत ठरली आहे.


कोणी विकत घेतला हा बैल?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा बैल ऑस्ट्रेलियामधील एका शेतकऱ्याच्या मालकीचा आहे. एबीसी न्यूजने दिलेल्या एका वृत्तानुसार या बैलाच्या वीर्याचा लिलाव क्विन्सलॅण्डमध्ये करण्यात आला. अनेक शेतकऱ्यांमध्ये या बैलाचं वीर्य विकत घेण्यासाठी चढाओढ सुरु होती. या वीर्याच्या मदतीने भविष्यात चांगलं आणि अधिक फायद्याचं पशुधन निर्माण करण्यासाठी फायदा करुन घेण्याच्या उद्देशाने त्यावर बोली लावली जात होती. अखेर या लिलावामध्ये पाम प्रिचर्ड नावाच्या व्यक्तीने बाजी मारली. 20 लाख रुपये किंमत मोजून हे वीर्य या शेतकऱ्याने विकत घेतलं.


बैलाचीच किंमत 2.68 कोटी रुपये


समोर आलेल्या माहितीनुसार हा बैल यापूर्वीही चर्चेत राहिला आहे. काही वर्षांपूर्वी याच बैलाचा सौदा तब्बल 2 कोटी 68 लाखांना करण्यात आला होता. हा बैल ब्रीडर कंपनीचे मालक असलेल्या रॉजर आणि लॉरेना जेफरीज यांनी विकत घेतला. मागील बऱ्याच वर्षांपासून है बैल ऑस्ट्रेलियामधील सर्वात महागडा बैल म्हणून ओळखला जातो. आता या बैलाच्या वीर्यानेही किंमतीचे नवे विक्रम मोडले आहेत.


या वीर्याचा फायदा काय?


पशुंमधील जेनेटिक्स अधिक सुधारण्यासाठी या वीर्याचा वापर केला जातो. तर या बैलाच्या वीर्याचा वापर करुन कमी दूध देणाऱ्या गायींच्या प्रजातीपासून जास्त दूध देणाऱ्या आणि आर्थिक दृष्ट्या फायद्याच्या वारसांना पैदास करता येते. पूर्वी अपारंपारिक पद्धतीने एका वेळेस एकाच मादीचं प्रजनन करता यायचं. मात्र आता एम्ब्रीओ ट्रान्सप्लाटच्या मादतीने एकाच वेळी अनेक गायांना गाभण करणं शक्य होतं.